ठाणे - वाढीव वीज बिल तसेच सक्तीची वीज बिल वसुली खोट्या वीज चोरीच्या पोलीस तक्रारी व टोरंट पावरच्या मनमानी कारभाराविरोधात मनसेने गुरुवारी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. मनसेने टोरंट कंपनीची दोन कार्यालये फोडली. याप्रकरणी नारपोली व शांतीनगर पोलिसांनी सात मनसैनिकांना अटक केली आहे. अरुण गव्हाणे, लखन पाटील, वैजनाथ पवार, समाधान गव्हाणे, ओमकार लवांडे, सचिन कांबळे आणि दत्ता रमेश टोले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
टोरंट पावरच्या मनमानी कारभाराचा निषेध करत खळ्ळखट्याक
भिवंडी शहरातील अंजूरफाटा येथील ओसवालवाडी तसेच वंजारपट्टी नाका चावींद्रा रोड येथील टोरंट पावरची कार्यालये मनसे कार्यकर्त्यांनी फोडली होती. यावेळी टोरंट पावरच्या मनमानी कारभाराचा निषेध करत मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मनसेचे भिवंडी शहराध्यक्ष मनोज गुळवी यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले होते. याप्रकरणी टोरंट पावरच्या अधिका तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा - सीरममध्ये 'अशी' झाली तयार कोविशिल्ड लस