ठाणे - तरुणांनी राजकारणात उतरु नये. मात्र, विद्यार्थ्यांवर जर अन्याय होत असेल तर त्यांनी गप्प बसायचं कारण नाही. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्द लढलं पाहिजे, असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. ते ठाणे येथे पुस्तक प्रकाशनामध्ये बोलत होते.
हेही वाचा - शशी शरूर यांच्याविरोधात त्रिवेंद्रम न्यायालयाने जारी केले अटक वॉरंट
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध देशभर आंदोलन होत आहेत. तसेच कायद्याच्या समर्थनार्थही मोर्चे निघत आहेत. कायद्याच्याविरोधात 'जामिया मिलीया इस्लामिया' विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. आंदोलनाल हिंसक वळण लागले. दिल्ली पोलीस विद्यापीठात शिरले व त्यांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच विद्यार्थ्यांनाही मारहाण केली. आंदोलकांनीही पोलिसांवर दगडफेक केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, डॉ. काकोडकर यावर बोलताना म्हणाले, आतापर्यंत विद्यार्थ्यांनी खूप आंदोलने केली आहेत हेही आंदोलन काही अनपेक्षीत नाही. विद्यार्थ्यांनी अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे असेही काकोडकर यावेळी म्हणाले.
ठाण्यात स्वत:च्या चरित्रग्रंथ प्रकाशन सोहळ्या दरम्यान ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध अणुशस्त्राज्ञ भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष पद्मश्री, पद्रमभूषण व पद्मविभुषणने गौरवलेले डॉ. अनिल काकोडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारीत ‘सूर्यकोटी समप्रभ द्रष्टा अणुयंत्रिक - डॉ. अनिल काकोडकर’ या चरित्रग्रंथाचे आज प्रकाशन करण्यात आले. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये हे चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. पद्मभूषण व आयसीटीचे माजी संचालक डॉ. ज्येष्ठ राज जोशी, पद्मभूषण व ज्येष्ठ खगोलशास्तज्ञ डॉ. शशीकुमार चित्रे, ज्येष्ठ वैज्ञानिक व विज्ञान कथा लेखक बाळ फोंडके व एनटीआरओचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ वैज्ञानिक आल्हाद आपटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.