ETV Bharat / state

Thane Crime : अपहरण करून विक्री करणाऱ्या त्रिकुटाच्या तावडीतून चिमुरड्याची सुखरूप सुटका; एक महिन्याने मुलगा आईवडिलांच्या कुशीत

भिवंडी शहरात कामतघर परिसरातून २६ डिसेंबर रोजी अपहरण झालेल्या दीड वर्षीय चिमुरड्याचा शोध लावण्यात भिवंडी शहर पोलिसांना दीड महिन्यांनी यश आले आहे. या चिमुरड्याला अपहरकर्त्याच्या तावडीतून सुखरूप सुटका केल्याने चिमुरडा आई-वडिलांच्या कुशीत विसावल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. याप्रकरणी अपहरण करून चिमुरड्याची विक्री करणाऱ्या एक व्यक्तीसह दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. गणेश नरसय्या मेमुल्ला (वय. 38) भारती सुशील शाहु (वय 41) व आशा संतोष शाहु (वय 42) असे अटक आरोपींची नावे असून, आरोपीमध्ये या दोन बहिणींचा समावेश असल्याचे समोर आले. तर सिद्धांत असे सुखरूप सुटका झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.

Safe Escape of A Child From The Clutches of a Trio of Kidnappers; A Month Old Baby in Arms of Parents
अपहरण करून विक्री करणाऱ्या त्रिकुटाच्या तावडीतून चिमुरड्याची सुखरूप सुटका; एक महिन्याने चिमुरडा आईवडिलांच्या कुशीत
author img

By

Published : Jan 27, 2023, 8:45 PM IST

Updated : Jan 27, 2023, 10:43 PM IST

अपहरण केलेल्या चिमुरड्याची सुखरूप सुटका

ठाणे : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील हनुमाननगर, कामतघर भागात चिमुरडा आईवडिलांसह राहतो. घटनेच्या दिवशी त्याची आई सुंदरी रामगोपाल गौतम या घरात कपडे धुवत असताना त्यांचा दीड वर्षीय वर्षीय सिद्धांत घराबाहेर खेळत असताना त्याचे अपहरण झाले होते. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके व वरिष्ठ पोनिरी चेतन काकडे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि रविंद्र पाटील,पो हवा खाडे, राणे, भोसले, पवार, कोदे, नंदिवाले, हरणे,गावीत असे पथक तयार करून गुप्त बातमीदाराच्या मदतीने तपास करताना जंगजंग पझाडले होते.

चिमुरड्याची एक लाखात विक्री : शिवाय पोलीस पथकाने नेपाळ सीमेपर्यंत आपला तपास करीत शोध मोहीम सुरु केली असताना एका मोबाईल क्रमांकाचा तांत्रिक तपास करीत संशयित आरोपी गणेश नरसय्या मेमुल्ला याला कामतघर परिसरातून ताब्यात घेऊन त्याकडे कसून चौकशी केली असता त्याने मूल चोरी करून 1 लाख 5 हजार रुपयांना विक्री केल्याचे कबुल केले. त्यानंतर पोलीस पथकाने भिवंडीतील पद्मानगर नवजीवन कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या आरोपी भारती सुशील शाहु व आशा संतोष शाहु या दोघींना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून चिमुरड्याची सुखरूप सुटका केल्यानंतर पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी चिमुरड्यास आईवडिलांच्या हाती सुखरूप स्वाधीन करून या तिघां विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून बेडया ठोकल्या आहेत.

मूल नसल्याने वर्षभरापूर्वी कट रचून चिमुरड्याचे अपहरण : आरोपी भारती सुशील शाहु व आशा संतोष शाहु या दोघी बहिणी असून आरोपी आशा हिस मूल नसल्याने तिने मूल विकत घेण्याचा निर्णय घेतला. तो तिने बहीण भारतीस बोलून दाखवला. त्यानंतर भारतीची ओळख आरोपी गणेश नरसय्या मेमुल्ला या सोबत असल्याने त्यांनी वर्षभरापूर्वी हा कट रचून चिमुरड्याचे अपहरण करून विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरोपी गणेश मेमुल्ला याने हनुमाननगर परिसरात टेहळणी करून लहान मूल हेरले त्यामध्ये सिद्धांत हा त्याच्या नजरेत आला व त्याने त्याचे अपहरण करून विक्री केल्याचे तपासात उघड झाले आहे.

अपहरण झाल्याच्या धक्क्याने आई आजारी : 26 डिसेंबर रोजी सिद्धांत हरविल्यापासून त्याचे पानपट्टी चालवीणारे त्याचे वडील रामगोपाल हे व आई सुंदरी मुलाच्या शोधात वेडेपिसे झाले होते. विशेष म्हणजे पोलीस तपास करीत असताना आई वडील सुध्दा शोध घेत वणवण फिरत होते .स्वतः जवळ गाडी नसताना शेजाऱ्यांकडून गाडी घेऊन व्यवसाय बंद करून मुंबई, ठाणे कल्याण, भिवंडी या परिसरात शोधून त्रस्त झाले होते. चिमुरड्याची आई तर अपहरण झाल्याच्या धक्क्याने आजारी पडल्याने आठ दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले.

आईवडिलांच्या अश्रूंचा फुटला बांध : 26 जानेवारी रोजी दोघे आईवडील भिवंडी शहरात शांतीनगर गैबीनगर परिसरात चिमुरड्याला शोधून रात्री साडेदहा वाजता घरी परतले असताना शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी मोबाईल वर फोन करून पोलीस ठाण्यात बोलावून घेतले व त्यांच्या समोर चिमुरड्यास हजर केल्यानंतर आईवडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. ते आनंदाश्रू पोलिसांच्या शोधा मुळे शक्य झाले असे सांगत सुंदरी गौतम यांनी पोलिसांच्या सहकार्या बद्दल आनंद व्यक्त केला .

पोलीस उपायुक्तांनी केला पोलीस पथकाचा सन्मान : शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकांनी महिनाभर या मुलाच्या शोधासाठी अथक प्रयत्न केले होते. पोलिसांच्या प्रयत्नांना यश येत दीड महिन्यांनी मुलाची सुखरूप सुटका करून आई-वडिलांच्या स्वाधीन केल्याने भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देत सन्मान केला

Last Updated : Jan 27, 2023, 10:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.