ETV Bharat / state

सचिन वाझे प्रकरण : एनआयएने छापा टाकत एका महिलेला घेतलं ताब्यात

author img

By

Published : Apr 1, 2021, 11:41 PM IST

Updated : Apr 2, 2021, 12:09 AM IST

सचिन वाझे प्रकरणात पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू असून एनआयएने गुरूवारी उशिरा रात्री एका महिलेला ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Sachin VAze Case : NIA team arrested one women in mira bhayandar thane
सचिन वाझे प्रकरण : एनआयएने छापा टाकत घेतलं एका महिलेला ताब्यात

मीरा भाईंदर (ठाणे) - सचिन वाझे प्रकरणात पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू असून एनआयएने गुरूवारी उशिरा रात्री एका महिलेला ताब्यात घेतले आहे. याची माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांच्या महितीनुसार, सचिन वाझे प्रकरणाचा तपास करण्याकरिता एनआयएची टीम मीरा रोड येथील सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्सला आली. या कॉम्प्लेक्सच्या सी विंगमधील रुम नंबर ४०१ वर टीमने छापा मारला. हा फ्लॅट मागील १५ दिवसांपासून बंद अवस्थेत होता. तेव्हा टीमने त्या फ्लॅटचे टाळे तोडत आतमध्ये प्रवेश केला. फ्लॅटची झाडाझडती घेत असताना टीमला एक महिला तिथे दिसून आली. तेव्हा टीमने त्या महिलेला ताब्यात घेतले.

सचिन वाझे प्रकरण : एनआयएने छापा टाकत एका महिलेला घेतलं ताब्यात

दरम्यान, त्या महिलेचे सचिन वाझेची संबंध असल्याचा संशय एनआयए टीमला आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. एनआयएची टीम मनसुख हिरेन व वाझे प्रकरणात काही धागेदोरे हाती लागतील का? याकरिता तपास करत आहे.

स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ

अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. यात 2 मर्सिडीज, 1 इनोव्हा, 1 प्राडो, 1 व्होल्वो, 1 आउटलँडर आणि शेवटची स्कॉर्पिओ जी स्फोटकांनी भरलेली होती. मात्र, जप्त केलेल्या 8 गाडयांपैकी 4 गाड्यांचा थेट संबंध पोलीस आयुक्तालयाशी होता, असे एटीएसच्या तपासात उघडकीस आले होते. दरम्यान, आठवी गाडी एनआएने काल (31 मार्च) वसईतून ताब्यात घेतली.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने या दरम्यान आतापर्यंत सचिन वाझें हा वापरत असलेल्या 8 गाड्या जप्त केल्या असून 15 मार्च रोजी इनोवा कार मुंबईतून जप्त करण्यात आलेली होती. तर ब्लॅक मर्सिडीज ही 16 मार्च रोजी क्रॉफर्ड मार्केट येथून जप्त करण्यात आली होती. तर 18 मार्च रोजी ब्लु कलरची मर्सडीज ठाण्यातून हस्तगत करण्यात आलेली होती. 22 मार्च रोजी व्हॉल्वओ कंपनीची गाडी एटीएस कडून जप्त करण्यात आलेले आहे. 30 मार्च रोजी नवी मुंबईतील कामोठे येथून आऊट लेंडर ही गाडी जप्त करण्यात आली होती तर 31 मार्च रोजी वसई-विरार परिसरांमधून ऑडी ही गाडी जप्त करण्यात आलेली आहे.

सचिन वाझेने विकत घेतल्या होत्या जिलेटिनच्या कांड्या

राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या चौकशी नुसार अँटिलिया या इमारतीच्या बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील जिलेटिनच्या कांड्या या स्वतः सचिन वाझें याने विकत घेतल्या होत्या. मात्र या जिलेटिनच्या कांड्या त्याने कधी व कुठून विकत घेतल्या होत्या, याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. सदरच्या कांड्या नागपूरमधील सोलर इंडस्ट्रीज कंपनीने बनवलेल्या असल्याचे याआधी समोर आले होते. नागपूरमधील जिलेटिनच्या कांड्या बनविणाऱ्या कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून बोलवले जाण्याची शक्यता आहे. त्यांची जबानी घेतली जाणार आहे. याआधी नागपूर पोलिसांनी या कंपनीच्या संचालकांचा जबाब नोंदवून घेतलेला आहे.

डायरीमधून महत्त्वाची माहिती समोर

या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींपैकी एक विनायक शिंदे याच्या कळवा येथील घरामधून राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळालेल्या डायरीमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विनायक शिंदेच्या घरात डायरी मिळाली असून, त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

हेही वाचा - अँटिलिया प्रकरणी मोठा खुलासा; मनसुख हिरेनने दिली होती सचिन वाझेला स्कॉर्पिओची चावी

हेही वाचा - वाझेच्या खासगी वाहन चालकाने अँटिलियाजवळ लावली होती 'ती' मोटार

Last Updated : Apr 2, 2021, 12:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.