ठाणे - उल्हासनगर ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत दौड करीत पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना काल श्रद्धांजली वाहण्यात आली. विशेष म्हणजे, १३० किलोमीटर सलग धावून सात धावपटूंनी हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली.
दोन वर्षांपूर्वी पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झाले होते जवान
उल्हासनगर शहरातील गोल मैदान भागातून या दौडला सुरुवात झाली. येथून दौड थेट मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर येऊन थांबली. दोन वर्षांपूर्वी कालच्या दिवशी (१४ फेब्रुवारी) जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेला काल दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हुतात्म्यांना वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी ही दौड आयोजित केल्याचे धावपटूंनी सांगितले.
हेही वाचा - दिव्यातील 'दबंग' पालिका अधिकाऱ्याची धमकीची क्लिप व्हायरल, पाठीशी कोण?
अमित राजगुरू, सागर जाधव, ऋषी दाभाडे, विजय मुदलियार, साई पगारे, प्रेम जाधव, अमित शर्मा हे या दौडमध्ये सहभागी होते. दरम्यान, पायलट म्हणून भावेश नांदकर आणि विशाल माळी यांचे विशेष सहकार्य लाभले.
हेही वाचा - कल्याण रेल्वे स्थानकात विषारी 'घोणस' दिसल्याने गोंधळ