मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा भाईंदर महानगरपालिका मध्ये करोडो रुपयांचा घोटाळा झाला आहे मात्र अनेक तक्रारी केल्यानंतर देखील कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही या बाबत काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
भाजप कडून करोडोचा घोटाळा -
मीरा भाईंदर शहरातील अनेक विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचं उघड झाला आहे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन शहरातील रस्ते,गटार,प्रवेशद्वार,या विकासकामामध्ये प्रशासकीय अधिकारी व ठेकेदार यांनी मिळून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सामंत यांनी केला.सत्ताधारी भाजप गेल्या २०१४ पासून अनेक घोटाळे उघड केले मात्र एकही उत्तर द्यायला प्रशासन तयार नाही आहे या ठेकेदार अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास राज्य सरकार कडे दाद मागू अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करू असे सामंत म्हणाले.
गेल्या अनेक वर्षांपासून एकच ठेकेदार -
मीरा भाईंदर महानगरपालिका कडून १ जानेवारी मध्ये एक निविदा काढण्यात आली.सदर निविदा सर्वधर्मीय उत्सव व विविध कार्यक्रमासाठी मंडप,लाईट,स्टेज,टेबल, खुर्ची,पार्टिशन, स्पीकर सेट,जनरेटर,रेलिंग, व मनपा निवडणूक व्यवस्था अंदाजित १२ करोड रुपयांची काढण्यात आली. सन २०१०-११ मध्ये एकूण खर्च ६० लाख रुपये पर्यंत असायचं सद्या स्थितीत करोडो रुपयांवर गेला आहे.मीरा भाईंदर शहरात २०० पेक्षा अधिक मंडप व डेकोरेशन काम करणाऱ्या कंपनी आहे मात्र अधिकारी आर्थिक तडजोड करत एकमेव शागिर्ड मंडप व डेकोरेशन या कंपनीला देण्यात येत आहे.यावेळेस देखील शागीर्ड या ठेकेदार ला ठेवा देण्यात येत आहे.सदर ठेकेदार ला ठेका देण्यात येऊ नये अशी मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी केली आहे.