ETV Bharat / state

रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशाचे आरपीएफ जवानाने वाचवले प्राण...सर्व थरार सीसीटीव्हीत कैद

author img

By

Published : Dec 5, 2019, 9:11 PM IST

घनसावंगी येथे राहणारे बबन सोनावणे हे रेल्वे रूळ ओलांडत होते. दरम्यान, कल्याणच्या दिशेने एक लांब पल्ल्याची रेल्वे येत असताना तिथेच तैनात असलेले आरपीएफ कॉन्स्टेबल अनिल कुमार यांनी क्षणाचा विलंब न करता रूळांवर उतरत बबन यांचे प्राण वाचवले. कुमार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून बबन यांचे प्राण वाचवल्याची ही थरारक घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

thane
रेल्वे रुळ

ठाणे - "देव तारी, त्याला कोण मारी" ही म्हण खरी ठरवणारी घटना ठाणे रेल्वे स्थानकात घडली असून या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

कॉन्स्टेबल अनिल कुमार
कॉन्स्टेबल अनिल कुमार

३ डिसेंबरला रात्री साडे दहाच्या सुमारास जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे राहणारे बबन सोनावणे (वय ५५) हे फलाट क्र. ६ वरून फलाट क्र. ७ वर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडत होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब फलाट क्र.7 वर असल्याने घाईघाईत रेल्वे रूळ ओलांडून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दरम्यान, कल्याणच्या दिशेने एक लांब पल्ल्याची रेल्वे येत असल्याचे त्यांनी पाहिले. बबन यांना रेल्वे रुळावर पाहताच ट्रेन चालकाने जोरात हॉर्न वाजवला, ज्याचा आवाज ऐकताच घाबरलेले बबन सोनावणे जागीच थबकले. येणारी ट्रेन त्यांना धडक देणार, असे वाटत असतानाच तिथे तैनात असलेले आरपीएफ कॉन्स्टेबल अनिल कुमार यांनी बबन यांना पाहिले. कुमार यांनी क्षणाचा विलंब न रूळांवर उतरत बबन यांचे प्राण वाचवले. कुमार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून बबन यांचे प्राण वाचवल्याची ही थरारक घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

आरपीएफ जवानाने वाचवले प्रवाश्याचे प्राण

हेही वाचा - कल्याण-बदलापूर महामार्गावर दुचाकीची ट्रकला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

तसेच समोरून येणाऱ्या ट्रेनने यावेळी 'इमरजन्सी ब्रेक्स' देखील दाबले. परंतु, अनिल कुमार नसते तर बबन यांचा मृत्यू अटळ होता. दरम्यान, हा संपूर्ण थरार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पडणाऱ्या कॉन्स्टेबल अनिल कुमार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनातर्फे रूळ ओलांडून जाऊ नये, यासाठीचे बॅनर लावण्यात येतात, जागृतीपर कार्यक्रम घेऊन माहिती दिली जाते. इतके असूनही प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात, हे चुकीचे असल्याचे पोलीस निरीक्षक राजीव पांडव म्हणाले. या घटनेपासून सर्वांनी धडा घेण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा - 'कामावर असताना कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केल्यास गांभीर्यपूर्वक घेऊन कारवाई करू'

Intro:रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवासाचे, RPF जवानाने वाचवले प्राण...सर्व थरार cctv मध्ये कैद.Body:
"देव तारी, त्याला कोण मारी" ही म्हण खरी ठरवणारी घटना ठाणे रेल्वे स्थानकात घडली असून या घटनेचा संपूर्ण थरार cctv मध्ये कैद झाला आहे. दिनांक तीन डिसेंबर रोजी रात्रौ साडे दहाच्या सुमारास जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे राहणारे 55 वर्षीय बबन सोनावणे हे फलाट क्र.6 वरून फलाट क्र. 7 वर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडत होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब फलाट क्र.7 वर असल्याने घाईघाईत रेल्वे रूळ ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच कल्याण च्या दिशेने एक लांब पल्ल्याची ट्रेन येत असल्याचे त्यांनी पाहिले. बबन यांना रेल्वे रुळावर पाहताच ट्रेन चालकाने जोरात हॉर्न वाजवला, ज्याचा आवाज ऐकताच घाबरलेले बबन सोनावणे जागीच थबकले. आता येणारी ट्रेन त्यांना उडवणार असे वाटत असतानाच तिथेच ड्यूटी वर तैनात RPF कॉन्स्टेबल अनिल कुमार यांनी क्षणाचा विलंब न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून रुळांवर उतरत बबन सोनवणे यांचे प्राण वाचवले. समोरून येणाऱ्या ट्रेन ने एमेरजन्सी ब्रेक्स दाबले खरे परंतु अनिल कुमार नसते तर बबन सोनावणे त्यांचा मृत्यू अटळ होता. हा संपूर्ण थरार रेल्वे स्थानकावरील cctv मध्ये कैद झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आपल्या प्राणांची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पडणाऱ्या कॉन्स्टेबल अनिल कुमार यांचे सर्वत्र कौतूक होत असून सर्वांनी यापासून धडा घेण्याची वेळ आता आली आहे.
Byte अनिल कुमार (वाचवनारा )
राजेन्द्र पांडव पोलिस निरीक्षक आर पीएफConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.