ठाणे - "६० वर्षांपूर्वी डोंबिवलीतील रस्त्यांची जी परिस्थिती होती, त्यापेक्षा आज दयनीय अवस्था आहे" अशा शब्दांत ज्येष्ठ संगीतकार पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी पालिका प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. यासोबतच, रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली. डोंबिवलीमध्ये एका कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
डोंबिवलीमध्ये एका कार्यक्रमाला जाताना, खड्डेमय रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे त्यांना आणि राधा मंगेशकर यांना या कार्यक्रमाला पोहोचायला उशीर झाला. त्याबद्दल त्यांनी कार्यक्रमाला आलेल्या प्रेक्षकांची माफीदेखील मागितली.
डोंबिवलीमधील डॉक्टर रघुवीर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह गायिका राधा मंगेशकर याही उपस्थित होत्या.
दरम्यान, शनिवारी सकाळी राज ठाकरे यांची डोंबिवलीतील मनसे पदाधिकाऱ्यांसह बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यांनाही खड्ड्यांमुळे बैठकीत पोहचण्यासाठी उशीर झाल्याने ही बैठकच रद्द करण्यात आली.
हेही वाचा : गड-किल्ले भाड्याने देण्यापेक्षा मंत्र्यांचे बंगले द्या - राज ठाकरे