ETV Bharat / state

हातगाडी घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला बसची जोरदार धडक; थरार सीसीटीव्हीत कैद

कल्याण नाका ते वांजरपट्टी नाका मार्गावर नेहमीच सर्व सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीतुन मार्ग काढत असतात. त्यातच पोलीस अधिकाऱ्यांसह सर्वच शासकीय यंत्रणांना देखील या वाहतूक कोंडीचा नेहमीच त्रास सहन करावा लागत असतो. मात्र, वाहतूक पोलिसांची कमतरता असल्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ट्राफिक वॉर्डनची मदत घेतली जाते. मात्र आजही या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.

हातगाडी घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला बसची जोरदार धडक

author img

By

Published : Jan 4, 2021, 7:32 PM IST

ठाणे : वांजरपट्टी नाका येथील पुलाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर विरुद्ध दिशेने हातगाडी घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला समोरून येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. या धडकेत हातगाडी चालक १० फूट लांब फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. तर या घटनेची अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता, आमच्याकडे या घटनेची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

हातगाडी घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला बसची जोरदार धडक

शहरात वाहतुक कोंडीची समस्या कायमच ...
कल्याण नाका ते वांजरपट्टी नाका मार्गावर नेहमीच सर्व सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीतुन मार्ग काढत असतात. त्यातच पोलीस अधिकाऱ्यांसह सर्वच शासकीय यंत्रणांना देखील या वाहतूक कोंडीचा नेहमीच त्रास सहन करावा लागत असतो. मात्र, वाहतूक पोलिसांची कमतरता असल्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ट्राफिक वॉर्डनची मदत घेतली जाते. मात्र आजही या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.

वाहतूक पोलिसांची चिरीमिरी वसुली ?
भिवंडी शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली असतांना समस्येकडे दुर्लक्ष करून वाहन चौकशीच्या नावाने शहरातील विविध नाक्यावर पोलिसांकडून वसुली केली जाते. या प्रकरामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे चौकशीच्या नावाने वाहन अडवून गाडीच्या कागदपत्रांची मागणी करून कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास चिरीमिरीची वसुली करीत असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या या दबंगगीरी वसुलीतून संबंधित अधिकारी नागरिकांची सुटका करतील का ? याकडे वाहन चालकांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.