ETV Bharat / state

रेमडेसिवीर हे लाईफ सेव्हिंग इंजेक्शन नाही - पालिका आयुक्त - कल्याण-डोंबिवली बातमी

राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने डॉक्टरांनी ऑक्सिजनच्या बचावासाठी रुटीन सर्जरी पुढे ढकलण्यात यावे, जेणेकरुन या ऑक्सिजनचा वापर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी होऊ शकेल, असे अवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांनी खासगी डॉक्टरांना केले आहे.

कडोमपा
कडोमपा
author img

By

Published : Apr 17, 2021, 7:19 PM IST

Updated : Apr 17, 2021, 7:47 PM IST

ठाणे - रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, रेमडेसिवीर इंजेक्शन लाइफ सेव्हिंग इंजेक्शन नसल्याचे कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी इतर अनेक इंजेक्शने औषधेही सोईचे आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर व प्लाज्मासाठी वेठीस धरू नये, अशा सूचनाही सर्व डॉक्टरांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बोलताना आयुक्त

डॉक्टरांना रुटीन सर्जरी पुढे ढकलण्याचे अवाहन

राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने डॉक्टरांनी ऑक्सिजनच्या बचावासाठी रुटीन सर्जरी पुढे ढकलण्यात यावे, जेणेकरून या ऑक्सिजनचा वापर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी होऊ शकेल, असे अवाहनही महापालिकेच्या आयुक्तांनी खासगी डॉक्टरांना केले आहे.

नव्याने रुग्णालय उभारण्याचे काम सुरू

नवे रुग्णालय उभारण्याचे काम सुरू असले तरी ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर नव्या खाटांची संख्या अवलंबून असणार आहे, असा खुलासाही महापालिका आयुक्तांनी केला असून महापालिका क्षेत्रातील रुग्णांची 128 मेट्रिक टनाची ऑक्सिजनची मागणी आहे.

हेही वाचा - सत्तेच्या हव्यासापोटीच महाराष्ट्राचा 'रेमडेसिवीर'चा पुरवठा थांबवला; सचिन सावंत यांचा आरोप

हेही वाचा - केंद्र सरकारचा महाराष्ट्राबरोबर दुजाभाव; नवाब मालिकांचा पुराव्यानिशी आरोप

Last Updated : Apr 17, 2021, 7:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.