नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) १०० किलो प्रमाणे फरसबीच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २३०० रुपये ते २५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे ६०० रुपये ते ७०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते ३२०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ४९०० ते ५६००रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ३००० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये दर (Vegetables Rate Today in APMC Market Navi Mumbai) आहेत.
पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८००रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २६००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे १०००० रुपये ते १२००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३२०० रुपये, वालवड प्रति १०० किलो २९०० रुपये ते ३२०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे १६०० रुपये ते १८००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ४३०० रुपये ते ४६०० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते २८०० रुपये दर (Vegetables Rate in APMC Market) आहेत.
पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १००० रुपये ते १४०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ४००रुपये ते ५०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १५०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये दर (APMC Market Navi Mumbai ) आहेत.