ETV Bharat / state

अखेर ठाण्यात रेपिड एक्शन फोर्स दाखल, नागरिकांना शिस्त लावण्याचे प्रयत्न - ठाणे रॅपिड अ‌ॅक्शन फोर्स न्युज

ठाणे जिल्ह्यात ४५७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच महापालिका हद्दीमध्ये २ हजार ७३९ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. मात्र, विनाकारण गाड्या घेऊन बाहेर फिरणे, गर्दी करणे, असे प्रकार घडत आहेत.

rapid action force thane  thane corona update  thane latest news  ठाणे लेटेस्ट न्युज  ठाणे रॅपिड अ‌ॅक्शन फोर्स न्युज  ठाणे कोरोना अपडेट
अखेर ठाण्यात रेपिड एक्शन फोर्स दाखल, नागरिकांना शिस्त लावण्याचे प्रयत्न
author img

By

Published : May 26, 2020, 4:35 PM IST

Updated : May 26, 2020, 5:54 PM IST

ठाणे - शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा संख्या वाढत आहे. मात्र, नागरिक प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे काणाडोळा करत असून सरकारी आदेश धुडकावत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी अखेर रॅपिड अ‌ॅक्शन फोर्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यांनी पथसंचलन करून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.

अखेर ठाण्यात रेपिड एक्शन फोर्स दाखल, नागरिकांना शिस्त लावण्याचे प्रयत्न

ठाणे जिल्ह्यात ४५७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच महापालिका हद्दीमध्ये २ हजार ७३९ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. मात्र, विनाकारण गाड्या घेऊन बाहेर फिरणे, गर्दी करणे, असे प्रकार घडत आहेत. बंदोबस्तासाठी पोलीस रात्रंदिवस काम करत आहेत. मात्र, आता पोलीस यंत्रणा देखील कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. राज्यात आतापर्यंत जवळपास १८ पोलीस कर्मचारी कोरोनाचे बळी ठरले आहेत. त्यामुळे अखेर रॅपिड अ‌ॅक्शन फोर्स सोमवारी शहरात दाखल झाली. या तुकड्यांनी ठाण्यातील वागळे इस्टेट, रामचंद्रनगर आदी भागात संचालन करत नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन केले.

Last Updated : May 26, 2020, 5:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.