ETV Bharat / state

ठाण्यासह मुंब्र्यात रमजान ईद उत्साहात साजरी

अबालवृद्ध नवीन कपडे घालून मशिदीत ईदची नमाज पडतात.  तसेच रमजान सणाच्या एकमेकांची गळाभेट घेऊन  शुभेच्छा देतात.  रमजानमुळे आज सर्वत्र प्रचंड गर्दी होत असल्याने पोलिसांनी देखील कडक बंदोबस्त लावला होता.

ठाण्यासह मुंब्र्यात रमजान ईद उत्साहात साजरी
author img

By

Published : Jun 5, 2019, 5:42 PM IST

ठाणे - आज रमजान ईद (ईद उल फित्र)चा सण देशात मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जात असून सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. त्याचप्रमाणे ठाणे आणि मुंब्र्यातही हा उत्साह पाहायला मिळाला. या निमित्ताने येथील मुस्लीम समाज बांधवांनी नमाज पठणासाठी मशिदींमध्ये सकाळी ७ पासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

ठाण्यासह मुंब्र्यात रमजान ईद उत्साहात साजरी

रमजानच्या पवित्र महिन्याची सांगता ईद उल फित्रच्या उत्सवाने साजरी केली जाते. संपूर्ण महिना कडक उपवास केल्यावर ईद च्या पकवानांचा आस्वाद घेतला जातो. यात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभागी होऊन साजरा करतात. अबालवृद्ध नवीन कपडे घालून मशिदीत ईदची नमाज पडतात. तसेच रमजान सणाच्या एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात.
रमजानमुळे आज सर्वत्र प्रचंड गर्दी होत असल्याने पोलिसांनी देखील कडक बंदोबस्त लावला होता. मशिदीत येणाऱ्या मुस्लीम बांधवांसाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. या नमाजींप्रती आपली सौहार्दता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पोलिसांनी त्यांना गुलाबपुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Intro:मुंब्रा येथे मुस्लिम बांधवांचा ईद उल फितर आनंदात साजरा Body:आज ईद उल फितर चा उत्सव संपूर्ण देशात मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा केला जात असून सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले होते. ठाणे व मुंब्रा येथील मुस्लिम बहुल परिसरातील मशिदींमध्ये सकाळी सात वाजल्यापासूनच मोठी गर्दी पहायला मिळत होती. रमजान च्या पवित्र महिन्याची सांगता ईद उल फितरच्या उत्सवाने साजरी केली जाते. संपूर्ण महिना कडक उपवास केल्यावर ईद च्या पकवनांचा आस्वाद घेतला जातो व यात सर्व धर्मीय मंडळी सर्व भेदभाव विसरून सामील होतात. आबालवृद्ध सर्वच जण नवे कोरे कपडे घालून आपल्या जवळच्या मशिदीत जाऊन ईद ची नमाज पढतात व एकमेकांची गळाभेट घेऊन "ईद मुबारक" बोलून शुभेच्छा देतात. आज सर्वत्र प्रचंड गर्दी होत असल्याने पोलिसांनी देखील कडक बंदोबस्त लावला होता. मशिदीत येणाऱ्या नमाजींना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. या नमाजींप्रती आपली सौहार्दता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे पोलिसांनी त्यांना गुलाबपुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. हा सण मोठ्या उत्साहात, आनंदात व शांततेत पार पडला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.