ETV Bharat / state

Raj Thackeray on Toll Rate : 'लोकांचा आक्रोश मुख्यमंत्र्यांना परवडणारा नाहीये', टोल दरवाढीवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल - ठाण्यातील आनंदनगर टोलनाका

Raj Thackeray on Toll Rate : टोल दरवाढी विरोधात मनसे नेते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. याच मुद्द्याला अनुसरुन मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे गेल्या ४ दिवसांपासून ठाण्यातील आनंदनगर टोलनाका या ठिकाणी आंदोलनास बसले होते. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जाधव यांची भेट घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय.

Raj Thackeray At Thane
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 4:01 PM IST

ठाणे : Raj Thackeray on Toll Rate : मागील ४ दिवसांपासून मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे टोल दरवाढी विरोधात आंदोलनास बसलेत. ठाण्यातील आनंदनगर टोलनाका या ठिकाणी मनसेचं हे आमरण उपोषण सुरू आहे. दरम्यान, या आंदोलनस्थळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. या संदर्भातील माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काय म्हणाले राज ठाकरे : मागील अनेक वर्षे टोलसंदर्भात मनसेनं आंदोलनं केली. अधिकृत आणि अनधिकृत असे जवळपास ६५ ते ६७ टोलनाके आम्ही बंद केलेत. 2014 आणि 2017 मध्ये शिवसेना-भाजपा जाहीरनाम्यामध्ये टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचे आश्वासन दिलं होतं. परंतु त्यांना टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं, हे कधीच विचारलं जात नाही. प्रत्येकवेळी टोलच्या आंदोलनाचं काय झालं, असा प्रश्न मला विचारल्या जातो. मात्र, त्याचे परिणाम अनेकांना दिसत नाहीत. तसंच टोल नाक्यावरून किती वाहनं जातात आणि किती टोल जमा होतो, त्या रकमेचं काय होतं, हा प्रश्न आहे. रस्ता कर तसंच टोलही भरावं लागत आणि इतर करही आपण भरतो. परंतु शहरांतील रस्त्यांवर खड्डे असतात आणि रस्ते नीट बांधले जात नाहीत. मग पैसे जातात कुठे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मला जनतेचं आश्चर्य वाटतं की निवडणुकीच्या काळात थापा मारतात, तुम्हाला पिळ पिळ पिळतात आणि तुम्हाला त्यांनाच मतदान करायचय. विरोधात मतदान झालेच नाही तर त्यांना समजणार कसं, असंही राज ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनीही केली होती याचिका : टोलविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील 2016 साली याचिका केली होती. त्यांनी ही याचिका का मागे घेतली आणि कोणी मागे घ्यायला लावली, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारायचाय. तसंच मागील चार दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अविनाश जाधव यांना मागे घेण्यास सांगितलय. लवकरच यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांची भेट घेईल. तेही ठाण्याचेच आहेत. निवडणूका तोंडावर आहेत. त्यामुळे लोकांचा आक्रोश त्यांना परवडणारा नाहीये, असंही राज ठाकरे यावेळी म्हणालेत.

हेही वाचा -

  1. Raj Thackeray : '...तर गालावर वळ उठतील', मराठी महिलेला मुंबईत ऑफिससाठी जागा नाकारल्यानंतर राज ठाकरे आक्रमक
  2. Avinash Jadhav Criticizes: मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेची मनसेने उडवली खिल्ली ...
  3. Raj Thackeray Appeal : सध्याच्या राजकीय परिस्थितीवरुन राज ठाकरेंचं साहित्यिकांना आवाहन; म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.