ETV Bharat / state

NIA Raid On PFI: भिवंडीतील पीएफआय कार्यालयावर धाड ; एक जण ताब्यात - पीएफआय कार्यलय भिवंडी

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्या देशभरातील लिंकवर छापे टाकले आहेत. एनआयए आणि ईडीने टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवल्याप्रकरणी भिवंडीतील पीएफआयच्या कार्यलयावर ( PFI Office Bhiwandi ) आज धाड टाकली आहे.

Raid On PFI Office In Bhiwandi One Arrested
पीएफआय कार्यालयावर धाड
author img

By

Published : Sep 22, 2022, 5:13 PM IST

ठाणे - पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील ( पीएफआय) मुख्य कार्यालयावर पहाटेपासून एनआयए , ईडी आणि स्थानिक पोलिसांनी धाड सत्र सुरू केली आहे. एनआयए आणि ईडीने टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवल्याप्रकरणी भिवंडीतील पीएफआयच्या कार्यलयावर ( PFI Office Bhiwandi ) आज धाड टाकली आहे. या धाडी दरम्यान एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली आहे. मोईनुद्दीन मोमीन असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात - भिवंडी शहरातील बंगलापुरा येथील पीएफआयच्या कार्यालयावर एनआयएच्या पथकाने छापेमारी करत काही वस्तू जप्त केल्या आहेत. तर या परिसरात सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ताब्यात घेतलेल्या मोईनुद्दीन मोमीन यांची बंगलापुरा भागातच मोठी इमारत आहे. या इमारतीच्या बाजूला एका कौलारू घरात पीएसआयचे कार्य करीत होते. त्याचा याच भागात चॉकलेट, बिस्कीट तयार करण्याचा मोठा कारखाना असल्याचे समोर आले आहे. या छाप्यात पीएसआयच्या कार्यालयातील काही साहित्य जप्त करण्यात येऊन मोईनुद्दीन मोमीन याला ताब्यात घेऊन एनआयएचे पथक भिवंडीतून मुंबईच्या दिशेने गेले आहेत.

भिवंडीतील पीएफआय कार्यालयावर धाड

कोंढवा येथील कौसरबाग येथील पीएफआयच्या मुख्य कार्यालयावर छापेमारी - पुण्यातील कोंढवा येथील कौसरबाग येथे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ( पीएफआय) मुख्य कार्यालयावर आज सकाळपासून एनआयएने छापेमारी सुरू केली (NIA raids PFI head office in Pune) आहे. एनआयए आणि ईडीने टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवल्याप्रकरणी देशभरातील पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. रात्री उशिरा हे छापे टाकण्यात आले. आज सकाळी पुण्यातील कोंढवा येथील कौसरबाग येथील पीएफआयच्या मुख्य कार्यालयावर छापेमारी करत काही प्रिंटर प्रकारच्या वस्तू जप्त केल्या आहेत. पीएफआयचे अध्यक्ष ओमा सलाम, राष्ट्रीय सचिव यांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले आहे. सुरक्षेसाठी सीआरपीएफची तुकडी देखील दाखल झाली आहे.

100 कार्यकर्त्यांना ताब्यात - अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दहा राज्यांमध्ये छापे टाकले जात आहेत. यावेळी पीएफआयच्या प्रमुख नेत्यांसह सुमारे 100 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पीएफआयने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, पीएफआयच्या राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक नेत्यांच्या घरांवर छापे टाकले जात आहेत. राज्य समिती कार्यालयावरही छापे टाकण्यात येत आहेत. आंध्र प्रदेशातून 5, आसाममधून 9, दिल्लीतून 3, कर्नाटकातून 20, केरळमधून 22, मध्य प्रदेशातून 4 महाराष्ट्रातून 20 जणांना अटक करण्यात आली आहे.

१०० हुन अधिक जणांना अटक - आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या दहशतवादविरोधी ऑपरेशनमध्ये, एनआयएने दहशतवादाशी संबंधित कारवायांमध्ये सामील असलेल्या लोकांच्या परिसराची देशभरात झडती घेतली. तसेच १०० हुन अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. एनआयए आणि ईडीने टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवल्याप्रकरणी देशभरातील पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. रात्री उशिरा हे छापे टाकण्यात (NIA raids Pune Mumbai Maharashtra) आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.