ETV Bharat / state

हप्तेखोर 'साहेबांच्या आशीर्वादा'मुळे खासगी बस चालकाची पोलीस कर्मचाऱ्यांशीच मुजोरी ! - ठाणे जिल्हा बातमी

वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला वाट काढण्यासाठी बेकायदा थांबा करून उभ्या असलेल्या बस चालकांना बस पुढे घेण्यास सांगितले असता, चालकांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी मुजोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा घटनांचा रुग्णावाहिकांमधील रुग्ण आणि रस्त्यावरील पादचाऱ्यांना फटका बसत आहे.

बस चालकाची पोलीस कर्मचाऱ्यांशी मुजोरी
बस चालकाची पोलीस कर्मचाऱ्यांशी मुजोरी
author img

By

Published : Dec 29, 2019, 4:00 PM IST

ठाणे - कल्याण शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सहजानंद चौकात खासगी बसेसच्या थांब्याला कल्याण वाहतूक विभाग व महापालिका प्रशासनाने 2004 सालापासून मनाई केली आहे. तरी देखील आजही खासगी कंपन्यांच्या बसेस या चौकात बेकायदा थांबा बनवून प्रवासी घेऊन जाण्यासाठी उभ्या राहत आहेत. त्यांना अटकाव केला असता ते पोलीस कर्मचाऱ्यांना उलट उत्तरे देत असल्याचेही चित्र आहे. साहेबांच्या हप्तेखोरीमुळे खासगी कंपन्यांचे बसचालक निर्ढावले असल्याचा आरोप केला जात आहे.

या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आजही कायम आहे. त्यातच वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला वाट काढण्यासाठी बेकायदा थांबा करून उभ्या असलेल्या बस चालकांना बस पुढे घेण्यास सांगितले असता, चालकांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी मुजोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

बस चालकाची पोलीस कर्मचाऱ्यांशी मुजोरी

हेही वाचा - 'त्या' मुख्याध्यापकासाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा; पीडितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न

कल्याण पश्चिमेकडील बैलबाजार ते लालचौकीपर्यंतच्या मार्गावर गेल्या 15 ते 20 वर्षात मोठ-मोठी शोरूम, हॉटेल, लग्नाचे हॉल, मार्गाच्या दोन्ही बाजूला व्यवसाय करत आहेत. विशेष म्हणजे पार्किंगची सोय नसल्याने या ठिकणी जाणारा ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करून खरेदीसाठी तासंतास दुकानात जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांसह पादचारीही तर कधी रुग्णवाहिकेतील रुग्णांनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसतो.

वास्तविक पाहता या वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी 2000 सालापासून कल्याण वाहतूक शाखा, महापालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या. त्यानंतर 2004 मध्ये वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सहजानंद चौकात खासगी बसेसच्या थांबाल्या मनाई करून तसा फलकही या ठिकाणी लावण्यात आला. या खासगी बसेसला दुर्गाडी किल्याच्या पायथ्याशी थांबा देण्यात आला. 2- 4 वर्षे या चौकात बसेस उभी करणे बंद होऊन काही प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या सुटली होती. मात्र, पुन्हा चौकात खासगी बसेस उभ्या राहू लागल्याने वाहतूक कोंडीने वाहनचालक व पादचारी त्रस्त झाले आहेत. खळबळजनक बाब म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेने हजारो रूपये खर्च करून जो खासगी बस व टेंपो उभा करण्यास मनाई फलक लावण्यात आला होता. तो लोखंडी फलकच कोणीतरी गायब केला आहे.

हेही वाचा - काँग्रसने नव्हे तर जनसंघाच्या सरकारने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना दिले होते भारतरत्न- डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी

कल्याण शहरातील वाहतूक कोंडीवर सर्वात मोठा तोडगा काढण्यासाठी दुर्गाडी किल्ला ते पत्रीपूल, असा खाडीलगत असलेल्या गोविंदवाडी बायपासचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून पूर्ण करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तरीही बैलबाजार ते लाल चौकीपर्यंत असलेल्या मार्गावर दिवसरात्र रहदारी असते. त्यातच या मार्गाच्या दोन्ही बाजूला मोठमोठ्या दुकानांच्या रांगा उभ्या राहिल्या. मात्र, या ठिकाणी पार्किंगची सोय नसल्याने दुकानात जाणारा ग्राहक वाहने रस्त्यावर सोडून दुकानात खरेदीसाठी जातात.

या मार्गावर थातूर-मातूर दिखाव्यासाठी कल्याण वाहतूक शाखेकडून टोईंग गाडीत दुचाकी उचलून कारवाई करण्यात येते. मात्र, दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनावर कारवाई करायची नाही. कारवाई केली तर ग्राहक पुन्हा दुकानात येणार नाही. त्यामुळे वाहतूक शाखेचे कर्मचारी व दुकानदारांमध्ये आर्थिक साटे-लोटे होऊन ग्राहकांच्या वाहनांना जॅमर लावण्यात येत नाही, असा खळबळजनक आरोप नागरिकांनी केला आहे. या दुकानदारांकडून वाहतूक शाखेला मासिक हफ्ता नियमितपणे जात असल्याचे वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांचे म्हणणे आहे. हीच तऱ्हा सदानंद चौकात बेकायदा उभ्या राहणाऱ्या खासगी बस चालक व वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांमध्ये असल्याचेही संतप्त नागरिकांकडून बोलले जात आहे.

दरम्यान, नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारो प्रवाशी या खासगी बससेमध्ये प्रवास करत असून या प्रवाशांना बसमध्ये चढण्यास बेकादेशीर बस थांबा आजही सहजानंद चौकात 'साहेबांच्या आशीर्वादा'ने कायम आहे.

Intro:kit 319Body:( Exclusive) साहेबांच्या हप्तेखोरीमुळे बस चालकाची पोलीस कर्मचाऱ्याशी मुजोरी !

ठाणे : कल्याण शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सहजानंद चौकात चौकात खासगी बसेसच्या थांब्याल्या कल्याण वाहतूक विभाग व महापालिका प्रशासनाने २००४ सालापासून मनाई केली आहे. तरी देखील आजही खासगी कंपन्यांच्या बसेस या चौकात बेकायदा थांबा बनवून प्रवासी घेऊन जाण्यासाठी उभ्या राहत आहे. त्यामुळे साहेबांच्या हप्तेखोरीमुळे या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आजही कायम असल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला वाट काढण्यासाठी बेकायदा थांबा करून उभ्या असलेल्या बस चालकांना बस पुढे घेण्यास सांगितले असता चालकांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याशी मुजोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
कल्याण पश्चीमेकडील बैलबाजार ते लालचौकीपर्यतच्या मार्गावर गेल्या १५ ते २० वर्षात मोठमोठी शोरूम, हॉटेल, लग्नाचे हॉल, मार्गाच्या दोन्हीबाजूला व्यवसाय करीत आहे. विशेष म्हणजे पार्किंगच सोय नसल्याने या ठिकणी जाणारा ग्रहाक रस्त्यावरच वाहन उभी करून खरेदीसाठी तासनतास दुकानात जातात. यामुळे वहातुक कोंडी होऊन वाहनचालकांसह पदचारीही तर कधी रुग्णवाहिकेतील रुग्णही या वाहतूक कोंडीचा फटका बसतो. वास्तविक पाहता या वहातुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी २००० सालापासून कल्याण वहातुक शाखा, महापालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या. त्यानंतर २००४ मध्ये वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सहजानंद चौकात खाजगी बसेसच्या थांबाल्या मनाई करून तसा फलकही या ठिकाणी लावण्यात आला. आणि या खाजगी बसेसला दुर्गाडी किल्याच्या पायथ्याशी थांबा देण्यात आला. दोन - चार वर्ष या चौकात बसेस उभी करणे बंद होऊन काही प्रमाणात वहातुक कोंडीची समस्या सुटली होती. मात्र पुन्हा चौकात खाजगी बसेस उभ्या राहू लागल्याने वाहतूक कोंडीने वाहनचालक व पदचारी त्रस्त झाले आहे. खळबळजनक बाब म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेने हजारो रूपये खर्च करून जो खाजगी बस व टेंपो उभा करण्यास मनाई फलक लावण्यात आला होता. तो लोखंडी फलकच कोणीतरी गायब केला आहे.
कल्याण शहरातील वहातुक कोंडीवर सर्वात मोठा तोडगा काढण्यासाठी दुर्गाडी किल्ला ते पत्रीपूल असा खाडीलगत असलेल्या गोविंदवाडी बायपासचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून पूर्ण करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तरीही बैलबाजार ते लालचौकीपर्यंत असलेल्या मार्गावर दिवसरात्र रहदारी असते. त्यातच या मार्गाच्या दोन्ही बाजूला मोठमोठ्या दुकानांच्या रांगा उभ्या राहिल्या. मात्र याठिकाणी पार्किंगची सोय नसल्याने दुकानात जाणार ग्राहक वहान रस्त्यावर सोडून दुकानात खरेदीसाठी जातात. या मार्गावर थातूरमातूर दिखाव्यासाठी कल्याण वाहतूक शाखेकडून टोईंग गाडीत दुचाक्या उचलून कारवाईत करण्यात येते. मात्र दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनावर कारवाई करयाची नाही. कारवाई केली तर ग्राहक पुन्हा दुकानात येणार नाही. त्यामुळे वाहतूक शाखेचे कर्मचारी व दुकानदारांमध्ये आर्थिक साटेलोटे होऊन ग्राहकांच्या वाहनांना जॉमर लावण्यात येत नसल्याने या दुकानदारांकडून वाहतूक शाखेला मासिक हफ्ता बांधल्याचा खळबळजनक आरोप वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांनी केला आहे. हीच तऱ्हा सदानंद चौकात बेकायदा उभ्या राहणाऱ्या खासगी बस चालक व वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांमध्ये असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान,नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारो प्रवाशी या खाजगी बससेमध्ये प्रवास करीत असून ह्याच प्रवाशांना बसमध्ये चढण्यास बेकादेशीर बस थांबा आजही सहजानंद चौकात साहेबांच्या आर्शिर्वादने कायम आहे.

Conclusion:kalyan
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.