ETV Bharat / state

PFI Stickers : नवी मुंबईत आढळले पीएफआयचे स्टिकर्स अन् बॉम्ब; गुन्हा दाखल - नवी मुंबई पोलीस

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या प्रतिबंधित संघटनेचे स्वागत करणारे स्टिकर नवी मुंबईत आढळून आले होते. तसेच नवी मुंबईतील काही घरांमध्ये फटाके बॉम्ब सापडले होते. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या कोणालाही अटक केलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jun 25, 2023, 7:31 PM IST

Updated : Jun 25, 2023, 10:42 PM IST

ठाणे - पीएफआय संदर्भातले स्टिकर्स आणि बॉम्ब जप्त करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. हे स्टिकर्स तसेच हे बॉम्ब कुठून आले आणि ते कोणी ठेवले याचा सविस्तर तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत. सध्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीएफआय जिंदाबादचा संदेश - नवीन पनवेलमध्ये असणाऱ्या नीलांगण या सोसायटीच्या फ्लॅट बाहेरच्या भिंतीवर पी एफ आय जिंदाबाद असा संदेश लिहिण्यात आला आहे व दोन जिवंत सुतळी बॉम्ब देखील तेथे ठेवण्यात आले आहेत. यामुळे परिसरात चांगलीच घबराट पसरली आहे. या सोसायटीतल्या रहिवाशांनी हा संदेश पाहताच तात्काळ खांदेश्वर पोलीस ठाणे गाठले व अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे. पीएफआय जिंदाबाद व दोन सुतळी बॉम्ब लावून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दहशत पसरवणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पीएफआयचे स्टिकर्स - शनिवारी पहाटे काही जणांनी स्टिकरवर हिरव्या शाईने 'पीएफआय झिंदाबाद' आणि '786' असे लिहिले होते. हे स्टिकर्स नवीन पनवेल परिसरातील काही घरांच्या प्रवेशद्वारावर चिकटवले होते. याशिवाय परिसरातील इतर दोन घरांमध्ये फटाके बॉम्ब आणि अगरबत्ती बांधलेल्या आढळून आल्याचे पोलिसांनी गुन्ह्याच्या अहवालात म्हटले आहे.

अधिक तपास सुरू - खांदेश्वर पोलिसांनी शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 153A अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती तपास करणाऱ्या पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

पीएफआयवर बंदी - गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने पीएफआय आणि त्याच्या अनेक सहयोगींवर संघटनांवर पाच वर्षासाठी बंदी घातली होती. या संघटनांवर ISIS सारख्या जागतिक दहशतवादी गटांशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे केंद्र सरकारने पीएफआयवर कठोर कारवाई केली होती.

पीएफआय कार्यकर्त्यांवर कारवाई - महाराष्ट्र एटीएसने ऑक्टोबर 2022 मध्ये पीएफआय पनवेलच्या सचिवाला अटक केली होती. याआधी देखील नवी मुंबई पोलिसांनी पीएफआयच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली होती. मागील वर्षभरात राज्यभरातून देखील अनेक पीएफआयचे कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटकही केली होती. अनेक ठिकाणी पीएफआयच्या कार्यालयावर एटीएसने छापेमारी करत देशविरोधी कृत्यांसाठी वापरात येणारे साहित्य जप्त देखील केले होते.

हेही वाचा -

  1. Blue Bells School Certificate Issue: दहशतवादी कार्यासाठी वापरलेल्या 'ब्ल्यू बेल्स' शाळेचे प्रमाणपत्र निघाले बोगस
  2. PFI Killer Squad : भारतात इस्लामिक राजवट लागू करण्यासाठी PFI ने बनवली होती 'किलर स्क्वॉड'!

Last Updated : Jun 25, 2023, 10:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.