ETV Bharat / state

राष्ट्रपती शौर्य पुरस्कार : उल्हासनगरच्या फायर ब्रिगेड ऑफिसरसह चौघांना शौर्य पदक जाहीर - स्टेशन फायर ऑफिसर संदीप आसेकर

उल्हासनगर महानगरपालिकेतील फायर ब्रिगेडच्या दलातील ४ कर्मचाऱ्यांना 'राष्ट्रपती शौर्य पुरस्कार' जाहीर झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्राला 8 शौर्य पदकं मिळाली आहेत.

ठाणे
ठाणे
author img

By

Published : Aug 14, 2021, 8:55 PM IST

ठाणे - उल्हासनगर महानगरपालिकेतील फायर ब्रिगेडच्या दलातील ४ कर्मचाऱ्यांना 'राष्ट्रपती शौर्य पुरस्कार' (Presidential Bravery Award) जाहीर झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या या पुरस्कारांमुळे उल्हासनगर (Ulhasnagar) शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. उल्हासनगर अग्निशमन दलाचे चीफ फायर ऑफिसर बाळू नेटके, डेप्युटी फायर ऑफिसर पंकज पवार, स्टेशन फायर ऑफिसर संदीप आसेकर व राजेंद्र राजन अशी राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झालेल्या जवानांची नावे आहेत.

उल्हासनगरच्या फायर ब्रिगेड ऑफिसरसह चौघांना शौर्य पदक जाहीर

१३५ रहिवाशांचा वाचवला जीव -

उल्हासनगर शहरातील मेहक अपार्टमेंट या इमारतीला २०१९ साली तडे गेले होते. त्यामुळे ही इमारत एका बाजूला झुकली होती. या इमारतीतून अग्निशमन दलाने १३५ रहिवाशांना बाहेर काढले. त्यानंतर काही क्षणातच ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. या कामगिरीसह उल्हासनगर शहरात अनेकदा इमारत कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. त्यामध्ये महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने केलेलं रेस्क्यू ऑपरेशन, या सगळ्याची दखल घेत उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलातील या चार कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. त्याची घोषणा आज झाली आहे.

महाराष्ट्राला ८ शौर्य पदकं -
उल्हासनगर फायर ब्रिगेडमधील अधिकाऱ्यासह कर्मचारी नेहमीच शहरवासियांच्या मदतीला धावून येत असतात. महापूर, आगीची घटना अथवा इमारत कोसळणे असो; फायर ब्रिगेडचे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी सदैव तत्पर असतात. आपल्या देशाचा ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशातून २५ फायर ब्रिगेडचे अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. त्यापैकी महाराष्ट्राला ८ शौर्य पदकं जाहीर झाली आहेत. त्या 8 पैकी 4 पदकं उल्हासनगरमधील फायर ब्रिगेडच्या 4 अधिकारी व कर्मचारी यांना मिळाली आहेत.

हेही वाचा - विचार नाही केला तर व्यक्त कसे होणार? हायकोर्टाचा केंद्राला झटका, नव्या आयटी कायद्यातील 'या' नियमाला स्थगिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.