ठाणे - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने टाळेबंदीमध्ये सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना मुंबई परिसरातील उपनगरीय रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. त्यांनतर 'अनलॉक' काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा असल्याने कल्याण रेल्वे स्थानकावर निवडक तिकीट खिडक्या सुरू होत्या. तर रेल्वे स्थानकावरील एटीव्हीएम मशीन गेल्या 10 महिन्यांपासून बंद होत्या. आता उद्यापासून मात्र सर्वांसाठी उपनगरीय रेल्वे सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर प्रवाशांची तिकीटासाठी गर्दी होण्याची शक्यता बघता, बंद असलेल्या एटीव्हीएम मशीनचे दुरुस्ती आणि अद्ययावतीकरणाचे काम आज सकाळपासून हाती घेण्यात आले. कल्याण रेल्वे स्थानकावरील 32 एटीव्हीएम मशीन असून या मशीन साफसफाईसह इतर देखभालीची कामे सुरू करण्यात आली. उद्या पहाटेपासून या सर्व मशीन पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
रेल्वेस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज; एटीव्हीएम मशीन देखभालीचे काम सुरू - रेल्वे प्रवाशांना मुंबई परिसरातील उपनगरीय रेल्वे सेवा
सर्वांसाठी उपनगरीय रेल्वे सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर प्रवाशांची तिकीटासाठी गर्दी होण्याची शक्यता बघता, बंद असलेल्या एटीव्हीएम मशीनची दुरुस्ती आणि अद्ययावत ठेवण्याचे काम आज सकाळपासून हाती घेण्यात आले.