ETV Bharat / state

पुढील आठवड्यात एकत्र चौकशीला बोलवा, ईडी अधिकाऱ्यांना प्रताप सरनाईकांची विनंती

author img

By

Published : Nov 25, 2020, 7:44 PM IST

आमदार प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना पुढच्या आठवड्यात एकत्रित कुटुंबाची चौकशी करावी, अशी विनंती केली आहे. मंगळवारच्या छापेमारीने सरनाईक कुटुंब मानसिक तणावाखाली असल्याचे चित्र आहे.

ठाणे
ठाणे

ठाणे - मंगळवारी पहाटेपासून सीआरपीएफची तुकडी आणि स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर 'ईडी'ने केलेल्या छापेमारीने ठाण्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र, ईडीच्या छाप्याने सरनाईक कुटुंब विस्कळीत झाले आहे. विदेशातून आल्याने प्रताप सरनाईक विलगीकरणात आहेत. तर त्यांच्या सुनेला ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सरनाईक यांच्या पत्नी मानसिक तणावाखाली असून उलट्या आणि अशक्तपणामुळे अत्यवस्थ आहेत. त्यावर आमदार प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना पुढच्या आठवड्यात एकत्रित कुटुंबाची चौकशी करावी, अशी विनंती केली आहे. मंगळवारच्या छापेमारीने सरनाईक कुटुंब मानसिक तणावाखाली असल्याचे चित्र आहे.

ठाणे

ईडीच्या छाप्याने सरनाईक कुटुंब मानसिक तणावाखाली

मंगळवारी छापेमारीनंतर सरनाईकांच्या मुलाला 'ईडी'च्या मुंबई कार्यालयात नेण्यात आले होते. चौकशी केल्यानंतर त्याला मंगळवारी रात्री सोडण्यात आले होते. बुधवारी पुन्हा ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितल्यानंतर प्रताप सरनाईकांनी पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती केल्याची माहिती उपलब्ध आहे. दरम्यान, ईडीच्या छाप्याने सरनाईक कुटुंब मानसिक तणावाखाली आहे. प्रताप सरनाईक यांची सून आणि विहंग सरनाईक यांची पत्नी अनाहिता यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ज्युपिटर रुग्णालयात अनाहिता यांची कोरोना चाचणीही केल्याची माहिती असून अहवाल गुरुवारपर्यंत अपेक्षित आहे. तर बाहेरगावावरून प्रवास करून आलेले प्रताप सरनाईक विलगीकरणात आहेत. सरनाईक यांची पत्नी नगरसेविका परिषा सरनाईक या अतिमानसिक तणावामुळे आजारी असून त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. एकंदर ईडीच्या छाप्याने अवघे सरनाईक कुटुंब मानसिक तणावाखाली आले असून रुग्णालयात दाखल झाल्याने आणि सरनाईक यांच्या ईडीच्या अधिकाऱ्यांना केलेल्या विनंतीमुळे बुधवारी सरनाईक यांची होणारी चौकशी ही पुढील आठवड्यात होणार आहे.

ठाण्यात राजकीय चर्चा सुरू

भाजपने राजकीय बदला घेण्यासाठी हा छापा टाकला असल्याची चर्चा आहे. अर्णब गोस्वामी प्रकरण आणि कंगना प्रकरणात सरनाईक यांनी केलेली कारवाईची मागणी ही या कारवाईला कारणीभूत असल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.