ETV Bharat / state

कर्जमाफीसह पीकविमा प्रश्नावर 'प्रहार', राज्यभरात 'जेलभरो आंदोलन'

पीक विम्याचा प्रश्न राज्यात दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे, या प्रश्नांकडे सरकारचेलक्ष वेधण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर प्रहारने 'जेलभरो आंदोलन' सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सोलापुरातही प्रहार पदाधिकऱ्यांनी आंदोलन केले.

author img

By

Published : Jul 31, 2019, 5:01 PM IST

Updated : Jul 31, 2019, 7:02 PM IST

कर्जमाफी आणि पीकविमा प्रश्नावर 'प्रहार' आक्रमक

सोलापूर - राज्यात सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिल्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. कर्जमाफीची घोषणा करून सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न राज्यात दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे, या प्रश्नांकडे शासनाचेलक्ष वेधण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर प्रहारने 'जेलभरो आंदोलन' सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सोलापुरातही प्रहार पदाधिकऱ्यांनी आंदोलन केले.

कर्जमाफी आणि पीकविमा प्रश्नावर 'प्रहार' आक्रमक

राज्यातील शेतकऱ्यांना जर प्रत्यक्षात कर्जमाफी मिळाली असती, तर शेतकरी राजा सुखी बनला असता आणि शेतकऱ्यांचा विकास झाला असता. मात्र, सरकारचे 'खायचे दात एक आणि दाखवायचे एक' त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे प्रहारने राज्यभरात जेलभरो आंदोलन सुरू केले आहे. तसेच वेळ पडलीच तर युती सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

सरकार ज्या अधिकाऱ्यांची नेमणूक करते ते अधिकारीच शेतकऱ्यांची लुट करतात. त्यामुळे याचा फटका गरीब शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

आंदोलनातील प्रमुख मागण्या

  1. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी
  2. पिकविम्याची रक्कम तातडीने खात्यावर जमा करावी
  3. शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपी रक्कम ज्या कारखान्यांनी दिलेली नाही, ती जमा करून कारखान्यांवर कारवाई व्हावी
  4. शेतीच्या पेरणी ते कापणी पर्यंतच्या कामांचा समावेश मनरेगा अंतर्गत करावा
  5. घोषित झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान द्यावे
  6. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करावे

Intro:सोलापूर : राज्यात शासनाने शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी दिल्याची घोषणा केली,परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक शेतकरी कर्जमाफीपासून कोसो दूर आहेत.ही घोषणा करून शेतक-यांची घोर फसवणूक केली,तसेच शेतक-यांच्या पीक विम्याचा प्रश्न राज्यात दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असल्याने या गंभीर प्रश्नांकडे शासनाचं
लक्ष वेधण्यासाठी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर प्रहारची 'जेलभरो'
आंदोलनं सुरु आहेत.त्याचाच एक भाग म्हणून आज सोलापुरातही प्रहार पदाधिकऱ्यांनी आंदोलन केलं.Body:राज्यातील शेतक-यांना जर प्रत्यक्षात कर्जमाफी मिळाली असती तर शेतकरी राजा सुखी बनला असता आणि शेतक-यांचा खरा विकास झाला असता परंतू शासनाचे 'खायचे दात एक आणि दाखवायचे एक' याचेमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडल्याचे दिसत आहे. कर्जमाफी केल्याची मोठी फुशारकी मारत भारतीय जनता पार्टीची सरकार मात्र निवडणुकीत या विषयाचं भांडवल करून मते मिळवून पुन्हा एकदा सत्ता काबिज करण्याचे प्रयत्न करत आहे. प्रहारच्या नेतृत्वाखाली राज्यातला शेतकरी वेळ आली तर युती सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी या निमित्ताने दिलाय. Conclusion:राज्यातील शेतक-यांच्या विविध प्रश्नी शासन गंभीरतेने पाऊले उचलत नाही आणि प्रशासनातील अधिकारी मात्र शेतकरी
कामगार,मजूर यांना देशोधडीला लावण्यासाठी वाट्टेल त्या स्तराला जायला तयार आहे.परंतु नागरिकांसाठी ज्या अधिका-यांची शासन
नेमणूक करते ते अधिकारीच शेतक-यांची लुट करीत असल्याने याचा फटका थेट गरीब शेतकऱ्यांना बसत आहे.त्यामुळं यापुढं तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिलाय.

जेलभरो आंदोलनातील प्रमुख मागण्या
१) शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी.
२) पिकविम्याची रक्कम तातडीने खात्यावर जमा करावी.
३) शेतक-यांच्या उसाची एफआरपीची रक्कम ज्या कारखान्यांनी दिलेली नाही ती जमा करून कारखान्यांवर कारवाई व्हावी.
४) शेतीच्या पेरणी ते कापणी पर्यंत कामांचा समावेश मनरेगा अंतर्गत करावा.
५) घोषित झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांना दुष्काळी
अनुदान द्यावे.
६) दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करावे.
Last Updated : Jul 31, 2019, 7:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.