ETV Bharat / state

Husband Beaten Police In Thane: नवरा बायकोतील वाद सोडवायला गेलेल्या पोलिसांनाच मारहाण; हल्लेखोर नवऱ्याला बेड्या - Husband Beaten Police In Thane

नवरा बायकोचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाच नवऱ्याने बेदम मारहाण केल्याची घटना ठाणे शहरात घडली. ही घटना कल्याण पूर्वेकडील विजयनगरमध्ये असलेल्या एका सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हल्लेखोर नवऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. महेश माने असे अटक नवऱ्याचे नाव आहे. मारहाण करण्यात आलेल्या पोलिसांची नावे नागेशनाथ निवृत्ती घुगे आणि हवालदार सांगळे आहेत.

Husband Beaten Police In Thane
पोलिसांना मारहाण
author img

By

Published : Apr 11, 2023, 7:34 PM IST

ठाणे: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी माने आणि त्याची बायको कल्याण पूर्वे कडील विजयनगर परिसरातील एका सोसायटीत राहते. त्यातच रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ठाणे पोलीस नियंत्रण कक्षातून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात संपर्क करण्यात आला. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयनगर भागात असलेल्या एका सोसायटीत नवरा-बायकोमध्ये वाद झाल्याचा फोन आला. नवरा आपल्या बायकोला शिवीगाळ करून मारहाण करत असल्याचे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सांगण्यात आले. तसेच त्या महिलेला मदतीची गरज असल्याने तातडीने त्याठिकाणी जाण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी हवालदार घुगे आणि सांगळे यांना दिल्या होत्या.

पोलिसांनाच मारहाण आणि शिवीगाळ: त्यानुसार रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस हवालदार सोसायटीत पोहोचल्यानंतर त्या महिलेच्या घरी गेले. त्यावेळी आरोपी महेश माने हा बायकोला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत तिला बेदम मारहाण करत होता. हवालदार घुगे आणि सांगळे यांनी आरोपी महेशला समजावून शांत राहण्यास सांगितले; मात्र तुम्ही मला सांगणारे कोण? असा प्रश्न करत आरोपी महेशने पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्यांना घराबाहेर हाकलून लावले. त्यानंतर सोसायटीच्या पार्किंगमध्ये दुचाकीवर हवालदार घुगे यांना जोरदार धक्का दिला. यात हवालदार घुगे यांना गंभीर दुखापत झाली.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल : घटनेतील आरोपी महेश माने हा दोन्ही पोलिसांना जुमानत नसल्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यातून आणखी पोलीस पथक मागविले गेले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मानेसह पथक घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी आरोपी महेशवर झडप घातली आणि त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले. यावेळी हवालदार नागेशनाथ घुगे यांच्या तक्रारीवरून महेश माने विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. कोळसेवाडी पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

तृतीयपंथीयांची पोलिसांना मारहाण: पोलिसांना नागरिकांकडून मारहाण झाल्याचा घटना काही नव्या नाहीत. अशीच एक घटना 21 सप्टेंबर, 2021 रोजी मुंबईत घडली होती. मुंबईतील बांगुर नगर पोलीस स्टेशन हद्दीतील भर रस्त्यात तृतीयांपंथीयांनी कपडे काढून पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. रिक्षाचालक व बाईक अपघात झाला. त्यानंतर रिक्षा चालकाच्या समर्थनात तृतीयांपंथी त्याठिकाणी आले. बाईकचालकाला मारहाण करण्यासाठी ते गेले. मात्र मधात आलेल्या पोलिसांनाच त्यांनी मारहाण केली. याप्रकरणी तीन तृतीयपंथीयांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तिघांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.

हेही वाचा: Hasan Mushrif Petition Reject : हसन मुश्रीफ यांना अटक होणार? जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.