ETV Bharat / state

Lady Orchestra Bar Raid : डोंबिवलीतील लेडीज ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड; १० बारबालासह २२ जणांना अटक

author img

By

Published : Jan 21, 2022, 9:09 PM IST

लेडीज ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली सर्रास डान्सबार सुरु आहे. त्यातच मानपाडा पोलिसांनी सेव्हन स्टार लेडीज ऑर्केस्ट्रा बारवर अचानक धाड टाकून १० बारबाला महिलांसहित ग्राहक, वेटर, हॉटेल मालक अशा एकूण २२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

बारमधील फोटो
बारमधील फोटो

ठाणे - एकीकडे राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अटीशर्तीचे प्रयत्न सुरु आहे. ठाणे जिल्ह्यात हॉटेल व्यावसायिकांना निर्बंध असताना डोंबिवली मानपाडा परिसरात कल्याण - शीळ मार्गावरील अनेक लेडीज ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली सर्रास डान्सबार सुरु आहे. त्यातच मानपाडा पोलिसांनी सेव्हन स्टार लेडीज ऑर्केस्ट्रा बारवर अचानक धाड टाकून १० बारबाला महिलांसहित ग्राहक, वेटर, हॉटेल मालक अशा एकूण २२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • नृत्य करणाऱ्या बारबालांवर पैसे उडविताना पोलिसांची धाड

मानपाडा पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर सेव्हन स्टार नावाने लेडीज ऑर्केस्ट्रा बार आहे. याठिकाणी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गाण्यावर अश्लील नृत्य आणि जमिनीवर बसून बीभत्स नृत्य करतात आणि नृत्य करणाऱ्या बारबालांवर पैसे उडवतात, अशी माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून मानपाडा पोलिसांच्या पथकाने काल रात्रीउशिरा या डान्स बारवर अचानक छापा टाकला.

  • सर्वाधिक लेडीज बार मानपाडा हद्दीत

सेव्हन स्टार बारमधून १० बारबालाना अश्लील नृत्य करत असताना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच ७ ग्राहक आणि १ म्युझिक ऑपरेटर, ३ वेटरसह बारमालक अशोक पंडा असे एकूण २२ जणांवर कारवाई करून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही सेव्हन स्टार बारवर कारवाई झाली होती. शिवाय कल्याण डोंबिवली क्षेत्रातील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक लेडीज ऑर्केस्ट्रा बार असून यामधील बहुतांश बारवर अनेकदा छापेमारी करून देखील बारमधील छमछम काही थांबताना दिसत नाही आहे.

हेही वाचा - Pune Crime : कुणाल धर्मे टोळीतील 8 जणांवर 'मोक्का' कायद्यांतर्गत कारवाई

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.