ETV Bharat / politics

नाशिक विभागात मित्रपक्षांच्या जागांवर भाजपाची नजर, अमित शाह आज आखणार रणनीती - Amith Shah Nashik visit updates

Amit Shah Nashik visit केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत भाजपाचे माजी पक्षाध्यक्ष शाह हे विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती आखणार आहे.

Amith Shah Nashik visit update
अमित शाह नाशिक दौरा (source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2024, 12:19 PM IST

नाशिक Amit Shah Nashik visit- लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रात मोठा फटका बसला. अवघ्या नऊ जागांवर समाधान मानावं लागल्यानं भाजपाला जेडीयूसह टीडीपीची साथ घ्यावी लागली. त्यामुळे भाजपानं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची धास्ती घेतली आहे. त्यामुळे खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. अमित शाह आज नाशिकमधील विधानसभा निवडणुकीबाबात आढावा घेणार आहेत.

राज्यात विधानसभा निवडणुकीत सध्या ताब्यात असलेल्या जागांसह अजून जागा वाढीव मिळाव्या, यासाठी भाजपानं कंबर कसली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नियोजनाची सूत्रे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हाती घेतली आहेत. यासाठी ते महाराष्ट्र दौरा करत आहे. शाह हे नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील तयारीचा आढावा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला बसलेला फटका पाहता सुक्ष्म नियोजनाद्वारे मंडळ स्तरावर विधानसभा निवडणूक लढविली जाणार आहे. त्यादृष्टीनं भाजपकडून संपूर्ण तयारी झाली आहे.

नाशिक विभागात मित्रपक्षांच्या जागांवर भाजपाची नजर- मागील विधानसभा निवडणुकीत नाशिक विभागात भाजपानं शिवसेनेबरोबरच्या युतीत एकूण 26 जागा लढविल्या होत्या. यातील 16 जागांवर यश मिळविले. तर 10 जागांवर त्यांचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. येत्या निवडणुकीत सध्या ताब्यात असणाऱ्या जागांसह आठ ते दहा वाढीव जागा मिळविण्याची तयारी भाजपानं केली आहे. काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत विभागातील 8 पैकीदिंडोरी, नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर आणि शिर्डी या सहा जागा महायुतीला गमवाव्या लागल्या. यातील चार मतदारसंघात भाजपाचे उमेदवार होते. या निकालानंतर भाजपाने चांगलीच धास्ती घेतली आहे. याची पुनरुक्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी भाजपाकडून सूक्ष्म नियोजन केले जात आहे.

बैठकीला हे नेते उपस्थित राहणार- केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थित नाशिक विभागातील विधानसभा संयोजक, प्रभारी, मंडळ अध्यक्ष, विधानसभा निवडणूक प्रमुख,आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या कामांचा आढावा घेऊन शाह मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला त्यांच्यासमवेत राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याणमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या बैठकीसाठी उत्तर महाराष्ट्रातील खासदार, आमदार तसेच संघटनेतील 750 पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

हेही वाचा-

  1. अमित शाहांबरोबर बैठक जागा वाटपाची की 'दादां'च्या मनाधरणीची ? शेवटी ठरलेले उत्तर देत नेते परतले - Amit Shah Maharashtra Visit
  2. भाजपाचा विदर्भावर 'फोकस'; लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळं पीएम मोदी, शाहांचे दौरे वाढले - Assembly Elections 2024
  3. 'शिंदे सरकार, मराठा सरदार'; संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बॅनर्स, कोणी लावले हे बॅनर? - CM Eknath Shinde Banner
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.