ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक 2024 Phase 2; मतदानाला सुरुवात, परदेशी शिष्टमंडळ देणार भेट, भाजपा नेत्यांचा 'हा' दावा - JK ASSEMBLY ELECTIONS 2024 - JK ASSEMBLY ELECTIONS 2024

Assembly Elections 2024 Live Updates : जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्याला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीचं निरीक्षण करण्यासाठी विविध देशातील सदस्यांचं परदेशी शिष्टमंडळ आज जम्मू काश्मीरला भेट देणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2024, 10:41 AM IST

Updated : Sep 25, 2024, 1:54 PM IST

श्रीनगर Assembly Elections 2024 Live Updates : जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या दुसऱ्या टप्प्याला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात जम्मू काश्मीरच्या 6 जिल्ह्यामधील तब्बल 26 जागांवर आज मतदान होणार आहे. या मतदानावर निगराणी करण्यासाठी अमेरिका, युरोपियन युनियन, रशिया आणि ऑस्ट्रेलियासह 16 परदेशी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळआज श्रीगनरमध्ये दाखल होत आहे. जम्मू काशअमीरमधील निवडणूक प्रक्रियेचं निरीक्षण करण्यासाठी केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय उच्चपदस्थ पथकाला निमंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात : जम्मू काश्मीरमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली. सकाळी 9 वाजतापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये 10 टक्के मतदान पार पडलं. या मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी परदेशी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ आज जम्मू काश्मीरमध्ये दाखल होत आहे. जम्मू काश्मीरची विभागणी करुन केंद्र शासीत प्रदेश केल्यानंतर पहिल्यांदाच या परिसरात निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

परदेशी शिष्टमंडळ देणार भेट : जम्मू काश्मीरचं विभाजन झाल्यानंतर पहिल्यांदाच तिथं विधानसभा निवडणूक 2024 घेतली जात आहे. मात्र या निवडणुकीची निगराणी करण्यासाठी भारत सरकारनं 20 सदस्यीय शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या शिष्टमंडळात चार सदस्य हे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे असणार आहेत. तर इतर सदस्य विविध देशातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे शिष्टमंडळ आज नवी दिल्लीला रवाना झालं आणि श्रीनगर, बडगाम आणि गंदरबल जिल्ह्यांमध्ये मतदानाचं निरीक्षण करणार आहे. शिष्टमंडळाचे सदस्य बडगाम आणि श्रीनगरमधील मतदारसंघांना भेट देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपाला नागरिकांचा मोठा पाठिंबा : जम्मू-काश्मीर भाजपाचे प्रमुख आणि नौशेरा मतदारसंघातील उमेदवार रविंदर रैना यावेळी विधानसभा निवडणूक 2024 वर भाष्य केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "भाजपाला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. नागरिक सकाळपासूनच मतदानासाठी रांगेत उभे आहेत. हा लोकशाहीचा सण आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमध्ये केलेल्या कामावर मला विश्वास आहे. जम्मू-काश्मीरचे नागरिक मोठ्या संख्येनं भाजपला मतदान करतील."

हेही वाचा :

  1. जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक, राज्यातील केवळ 'या' नेत्याचा समावेश - congress 40 star campaigners
  2. जम्मू काश्मीर निवडणुका : एकीकडे वारशासाठी लढा, नव्या पिढीलाही आशा - Jammu Kashmir Elections
  3. जम्मू काश्मीरमधील लाल चौकात जायला घाबरत होतो : माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंचं खळबळजनक वक्तव्य - Sushilkumar Shinde On Kashmir Visit

Last Updated : Sep 25, 2024, 1:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.