ठाणे - राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर एका अभियंत्याला मारहाण करण्यात आल्याची तक्रार वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. आता या अभियंत्याला पोलीस कर्मचारी घेऊन जातानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणामध्ये आता सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहे. यामध्ये अनंत करमुसे यांना पोलीस कर्मचारी घेऊन जातानाचे हे सीसीटीव्ही फुटेज आहेत. वर्दीचा गैरवापर करत अनंत यांना गंभीर मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या पोलीस सुरक्षा रक्षकांचा सहभाग असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सुरक्षारक्षकांचे काम सुरक्षा करणे असते मात्र, त्यांनी अनंत यांना घरातून चौकशीसाठी घेऊन जाऊन गंभीर मारहाण केल्याच्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.