नवी मुंबई - नेरुळच्या सेक्टर 4 मधील एका सोसायटीमध्ये जीवनावश्यक वस्तूची, होम डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या डी मार्टच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. विशेष बाब म्हणजे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन डी मार्टचे कर्मचारी वस्तूंची डिलिव्हरी नागरिकांना देत होते. या मारहाणीची घटना सोसायटीमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
नवी मुंबई परिसरात लॉकडाऊनच्या नियमांचे पालन योग्य पद्धतीने केले जात आहेत. रविवारी नेरुळमधील सेक्टर ४ च्या अमेय सोसायटीमधील नागरिकांनी डी मार्ट मधून जीवनावश्यक वस्तूंची ऑर्डर केली होती. तेव्हा डी मार्टचे कर्मचारी त्या वस्तू घेऊन सोसायटीमध्ये आले.
नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून त्या वस्तू घेत होते. गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी हा उपाय केला होता. मात्र पोलिसांनी कोणत्याही गोष्टींची खातरजमा न करता, वस्तू घेऊन आलेल्या डी मार्टच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यामुळे नागरिकांमधून पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - कोपरी 'ग्रीन झोन' म्हणून घोषित तर मुंब्रामध्ये 62 इमारती सील करण्याचे आयुक्तांचे आदेश
हेही वाचा - मनसे आमदार राजू पाटलांनी रुग्णालय दिले कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी