ETV Bharat / state

धक्कादायक; संपत्तीच्या वादातून मामांंचा भाच्यावर गोळीबार, 7 जणांना अटक

उत्तर प्रदेशमधील मूळ गावातील आईच्या हिश्यावरून मामांसोबत घर आणि जमिनीच्या प्रॉपर्टीवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. सुमारे १० कोटींची प्रॉपर्टी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या प्रॉपर्टीमध्ये अब्दुल सत्तार हा भाचा अडथळा ठरत आहे.

crime
अब्दुल सत्तार मोहम्मद इब्राहिम मंसुरी
author img

By

Published : Aug 24, 2020, 3:31 PM IST

ठाणे - उत्तरप्रदेशमधील कर्नलगंज, फुलपूर या मूळ गावातील घर व शेतजमीन प्रॉपर्टीचा वाद मामा व भाच्यात सुरू होता. या वादातून मामा मंडळीने एक भाचा व भाऊ, मेहुणे आदींना सोबत घेऊन प्रॉपर्टीमध्ये अडथळा ठरणाऱ्या भाच्याला कायमचा संपवण्याच्या इराद्याने बंदुकीच्या चार गोळ्या झाडून त्याला गंभीर जखमी केले होते. मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना भिवंडी शहरातील गुलजार नगर परिसरात गुरुवारी रात्री घडली होती. अब्दुल सत्तार मोहम्मद इब्राहिम मंसुरी (६५ रा. गुलजार नगर ) असे बंदुकीच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या भाच्याचे नाव आहे.

याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात आदी कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र भाचा अब्दुल सत्तार यांचा उपचारादरम्यान झाल्याने कलम ३०२ प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल करीत ७ जणांना आतापर्यत अटक करण्यात आली आहे.

मृतक अब्दुल सत्तार उत्तर प्रदेशमधील मूळ गावातील आईच्या हिश्यावरून मामांसोबत घर आणि जमिनीच्या प्रॉपर्टीवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. सुमारे १० कोटींची प्रॉपर्टी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या प्रॉपर्टीमध्ये अब्दुल सत्तार हा भाचा अडथळा ठरत आहे. त्यामुळे त्याचा कायमचा काटा काढण्याचा कट मामा सिराज उर्फ सोनू मुस्तफा मंसुरी ,वकील मंसुरी, शकील मंसुरी, इस्तीयाक मंसुरी यांनी रचला होता. भाचा अब्दुल रज्जक मोहम्मद इब्राहिम मंसुरी, मेहुणे इसरार मोमीन, मुमताज अन्सारी आदींच्या साथीने अब्दुल मंसुरी हे त्यांच्या मेडिकल दुकानातून गुरुवारी रात्री घरी जात असताना त्यांना रस्त्यात गाठून त्यांच्यावर बंदुकीतून चार गोळ्या झाडून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या गोळीबाराच्या हल्ल्यात अब्दुल मंसुरी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या मानेतून आरपार झाल्या आहेत तर एक गोळी पोटात व एक छातीमध्ये वर्मी लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

गोळीबाराच्या घटनेच्या दिवशी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे व एसीपी नितीन कौसडीकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन हल्लेखोरांना पकडण्याचे आदेश शांतीनगर पोलीस ठाण्यास दिले. त्यामुळे पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब मुल्ला आदींच्या पोलीस पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवून हल्लेखोर अब्दुल रजाक मोहम्मद इब्राहिम मंसुरी व इसरार अहमद यार मोहम्मद मोमीन या दोन मुख्य हल्लेखोरांना ताब्यात घेऊन अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना २७ ऑगष्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर अन्य पाच हल्लेखोरांना शांतीनगर पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे सांगितले असून त्यांनाही शनिवारीच न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.