ETV Bharat / state

Bhivandi Crime News : आमदारांनी छापे टाकून जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले, कारवाईनंतर पोलिसांकडून तीन आरोपींना अटक

author img

By

Published : May 24, 2023, 7:52 PM IST

Updated : May 24, 2023, 8:59 PM IST

कामगार नगरीसह यंत्रमाग नगरी असलेल्या भिवंडी शहरात झोपडपट्टी ते हायप्रोफाईल परिसरात सर्रास जुगार व मटक्याचे अड्डे ठिकठिकाणी सुरू असल्याचे दिसून आले आहे. मात्र, पोलिसांनी धाडी टाकूनही शहरातील कामगार वस्त्यात जुगार मटका सुरू असल्याचे दिसून आले.

Bhivandi Crime News:
भिवंडी गुन्हे न्यूज
आमदार रईस शेख यांनी जुगाऱ्याल पकडे

ठाणे : आमदार रईस शेख यांनी एका अड्ड्यावर अचानक धाड टाकून जुगारी व माफियांना रंगेहाथ पकडले. पोलिसांना जे जमले नाही, ते आमदारांनी करून दाखविले, अशी परिसरात चर्चा सुरू आहे. पोलिसांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केल्याचे बोलले जात आहे.

मटक्याचे अड्ड्यासह विविध प्रकारचे गोरखधंदे : भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात कामगार वस्त्या आहेत. या वस्त्यात लाखोंच्या संख्येने कामगार वर्ग राहतात. या कामगार वर्गात अनेकांना दारूचे व्यसन आणि मटका, जुगाराचा नाद आहे. यामुळे वस्त्या वस्त्यात ठिकठिकाणी जुगार मटक्याचे अड्ड्यासह विविध प्रकारचे गोरखधंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी समोर येतात. नेहमीच विविध राजकीय पक्षासह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करत असतात. अशीच एक तक्रार भिवंडीतील समाजवादीचे आमदार रईस शेख यांच्याकडे करण्यात आली होती. त्यातच आमदार शेख यांचा महापालिका अधिकाऱ्यासह नालेसफाईचा पाहणी दौरा २३ मे रोजी होता.

छापेमारीनंतर पोलिसात खळबळ : आमदार दौऱ्या दरम्यान दुपारी चार वाजल्याच्या सुमारास भिवंडीतील भरत कंपाऊंड भागातील नालेसफाई पाहणीसाठी गेले. यावेळी आमदार शेख यांना मटका जुगार अड्डा सुरू असल्याचे दिसले. त्यांनी एका जुगार माफियाला पकडले. त्यानंतर बंद शटर आड मोठ्या प्रमाणात विविध जुगाराचे साधने आणि आणखी काही जुगार माफिया आढळून आले. आमदार शेख यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात या छापेमारीची माहिती दिली. या छापेमारीनंतर पोलिसात खळबळ उडाली.

आमदारांच्या छापेमारीनंतर पोलिसांची कारवाई-काही वेळातच पोलीस जुगार अड्ड्यावर दाखल झाले. त्यांनी जुगार माफिया अहमदअली उस्मान कारभारी (वय ५२, रा. तोफानाका, भिवंडी) निहाल अहमद अब्दुल मजीद मोमीन ( वय ५९, रा. शांतीनगर, भिवंडी ) अबु सत्तार फतेअहमद शेख (वय ६०, रा. नविवस्ती, भिवंडी ) यांना ताब्यात घेतले. त्यानंतर जुगार मटक्याच्या अड्ड्यातुन दाणा घोडी, अंदर बहार , काला पिलासह कल्याण मेन मटका जुगाराचे साहित्य आणि ३ हजार ५५० रुपये रोख जप्त केले. या जुगार अड्ड्यावर आमदारांनी धाड टाकल्याने मग शहरातील पोलीस करतात काय ? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रवींद्र बारकु पाटील यांच्या तक्ररीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात जुगार माफिया त्रिकुटावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार अनिल शिरसाठ करीत आहेत.

हेही वाचा-

  1. Nashik Crime : धक्कादायक! वाढदिवसानिमित्ताने अल्पवयीन मैत्रिणीला घरी बोलावले अन् केला बलात्कार
  2. Amravati Crime News: 13 दिवसांपासून सुरू असलेली चिमुकलीची झुंज संपली... विष देणाऱ्या आईविरोधात गुन्हा दाखल
  3. Court verdict :.... तर बायकोला पोटगीचा अधिकार नाही - उच्च न्यायालय

Last Updated : May 24, 2023, 8:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.