ठाणे : जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत असताना गुन्हेगारी क्षेत्रातून मोठी घटना समोर आली आहे. भिवंडी तालुक्यातील मानकोली येथील रुग्णालय उपकरणे साठविलेल्या गोदमातील दीड कोटींच्यावर आरोपींनी चोरी केली होती. याप्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर दुसरीकडे एका चोरी प्रकरणात आरोपीकडून २५ लाखांचे टीव्ही जप्त करण्यात आले आहे.
आरोपींकडून मुद्देमाल जप्त : पहिल्या गुन्ह्यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या तीन साथीदाराचा शोध सुरू आहे. अटक चोरट्याकडून चोरीस गेलेला १ कोटी २५ लाख ६१ हजार ९६८ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. मोहमंद सलीम मोहमंद इद्रीस चौधरी,(वय 41, रा.घुंघटनगर, भिवंडी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यातील पुर्णा गावातील ओसवाल कंपाऊंडमध्ये असलेल्या राज ट्रेडर्सच्या गाळ्याचे शटर वाकवून त्या गोदामातून ७५ लाखाचे विविध कंपनीचे टीव्ही लंपास करणाऱ्या एका चोरट्या अटक करून त्याच्याकडूनही आतापर्यत 75 लाखांचे टीव्ही जप्त केले. रेहान खान असे चोरट्याचे नाव आहे.
घरफोडीत कोटींचे साहित्य लंपास : पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकोली वेहळे रोड येथील श्री माँ बिल्डींग या गोदमातील दोन गाळ्यांमध्ये महागडे सोनोग्राफी, रोबोटीक रुग्णालय उपकरणे साठविलेले होते. त्याठिकाणी 15 जानेवारीच्या मध्यरात्री घरफोडी होऊन 1 कोटी 38 लाख 5 हजार 627 रुपयांच्या उपकरणांची चोरी करण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळाल्यावर कंपनीच्या वतीने 19 जानेवारी रोजी नारपोली पोलीस ठाण्यात देत गुन्हा नोंदविण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील व त्यांच्या सोबत पोलीस पथकाने घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना गोदाम परिसरात लाईट अथवा सीसीटीव्ही नसल्याने आरोपी शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
अशी केली कारवाई : घटनास्थळाच्या काही अंतरावरील आजुबाजुस असलेले सिसिटीव्ही मध्ये पहाटेच्या सुमारास एका गाडीच्या लाईटचा प्रकाश दिसुन आल्याने तोच धागा पकडून त्या रस्त्यावरील पुढील सिसिटीव्ही कॅमेरे तपासले असत सदरचा प्रकाश हा संशयित पिकअप टेम्पो वाहन असल्याचे समजल्यावर पोलीस शिपाई सचिन देसले व जनार्दन बंडगर यांनी या मार्गा वरील 34 ठिकाणी लावलेल्या सिसिटीव्हीची पाहणी करून टेम्पो चा क्रमांक एम एच 04 जी आर 8446 असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून टेम्पो मालक मोहमंद सलीम मोहमंद इद्रीस चौधरी, यास ताब्यात घेऊन त्याकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्याने तीन साथिदारांच्या मदतीने चोरी करून सदरचा माल हा त्याच्या टेम्पो मधुन घेवुन गेला असल्याचे कबुल केले. त्यानंतर आरोपी मोहमद सलीम चौधरी यास या घरफोडीच्या गुन्हयात अटक करून त्याच्या जवळून 1 कोटी 25 लाख 61 हजार 968 रुपये किमतीची उपकरणे जप्त केले आहेत.
२५ लाखांचे टीव्ही जप्त : दुसऱ्या चोरीचा गुन्हा भिवंडी तालुक्यात पुर्णा गावातील ओसवाल कंपाऊंडमध्ये असलेल्या राज ट्रेडर्सच्या गाळ्याचे शटर वाकवून त्या गोदामातून ७५ लाखाचे विविध कंपनीचे टीव्ही घरफोडी करून चोरटयांनी लंपास केले होते. या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यासाठी तपास पथक तयार केले. या तपास पथकाने बातमीदाकडून मिळालेल्या माहितीवरून शहरातील कोंबडपाडा येथील रेहान खान यास अटक केली आणि त्याच्याकडून २५ लाख ६० हजाराचे टीव्ही हस्तगत केले. एकंदरीतच दोन्ही मोठ्या घटनेत गोदामातुन चोरीस गेलेल्या मुद्देमालचा तपास नारपोली पोलिसांनी उघकीस आल्याने त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कैतुक केलं जात आहे.