ठाणे - गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये बहुतांश रासायनिक कंपन्या बंद होत्या. यामुळे जिल्ह्याच्या पर्यावरणात बदल होऊन नागरिकांच्या आरोग्याचा धोका काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र, लॉकडाऊन शिथील केल्यापासून पुन्हा पर्यावरणाला हानी पोचविण्याचे काम काही रासायनिक कंपन्या करीत असल्याचे, अंबरनाथ औद्योगिक वसाहतीत समोर आले आहे. या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार रासायनिक कंपनीच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.
टाकाऊ रासायनिक द्रव्याची डोंगरात विल्हेवाट
आनंदनगर (पूर्व) भागात असलेल्या डोंगरांमध्ये या औद्योगिक रासायनयुक्त सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर कारखान्याचे मालक अतुल एम. बिर्ला, सचिन पोरे, रविश कुंडले व जागेचे मालक डोंगरे यांच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे, पोलीस उपनिरीक्षक एम. जी. जमदाडे हे करत आहेत.
हेही वाचा - ...तर देशातील ९ लाख औषध विक्रेते, वितरक जाणार बेमुदत संपावर