ठाणे : Physical Abuse of Minors : बाबर अकबर अन्सारी (वय २१, बनेली, टिटवाळा) असे अटक नराधमाचे नाव आहे. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलं उल्हासनगर कॅम्प नंबर २ भागातील एका इमारतीमध्ये राहतात. तर नराधम बाबर हाही पीडित मुलांच्या शेजारी राहत होता. मात्र, यापूर्वी त्याने एका पीडित मुलावर लैगिंक अत्याचार केल्याचे परिसरातील नागरिकांना समजल्याने त्याला या भागातून हाकलून लावले होते. त्यातच नराधम टिटवाळा नजीक बनेली गावातील एका चाळीत राहतो. त्यातच नराधम बाबर हा २१ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास टिटवाळावरून पुन्हा पीडित मुलं राहत असलेल्या परिसरात आला होता. त्यावेळी त्याने ९ वर्षीय पीडित मुलाला बहाण्याने एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या शौचालयाच्या कोपऱ्यात घेऊन गेला. त्यानंतर त्या पीडित मुलावर त्याने लैगिंक अत्याचार केला.
आरोपीला अटक : अत्याचारानंतर पीडित मुलाला घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान पीडित मुलगा त्याच्या तावडीतून सुटल्यानंतर त्याने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगताच, तिला धक्काच बसला. पीडित मुलाच्या आईने त्याला घेऊन उल्हासनगर पोलीस ठाणे गाठले आणि पीडित मुलावर घडलेल्या प्रसंगाचे कथन केले. पोलिसांनी पीडित मुलाची आई (वय ३६) हिच्या तक्रारीवरून नराधम बाबर विरोधात २१ ऑक्टोंबर रोजी रात्री उशिरा उल्हासनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ५०६, सह पोक्सो कलम ४,६,८,१०,१२ नुसार गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असता, (आज) २२ ऑक्टोंबर रोजी त्याला पहाटेच्या सुमारास अटक केली गेली.
आरोपीला पोलीस कोठडी : या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्याशी संपर्क साधला असता, पीडित दोन अल्पवयीन मुलांवर लैगिंक अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक केली गेली. आज (रविवारी) सुट्टीच्या विशेष न्यायालयात हजर केले असता त्याला २६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास उल्हासनगर पोलीस पथक करीत आहे.
हेही वाचा: