नवी मुंबई - वातावरणात एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे नवी मुंबई परिसरात २५ डिसेंबरला तुरळक पाऊस पडला. तसेच २६ डिसेंबरला आकाश ढगाळ असल्याने त्याचा परिणाम गुरुवारी होणाऱ्या कंकणाकृती सूर्यग्रहणावर झाला. यामुळे नवी मुंबईत सूर्यग्रहण दिसू न शकल्यामुळे खगोलप्रेमी निराश झाले.
बुधवारी पहाटेपासून आणि दिवसभरात नवी मुंबई भागात तुरळक पावसाचा शिडकावा झाला होता आणि वातावरणही ढगाळ होते. आज गुरुवारी सूर्यग्रहणाच्या दिवशीही तीच स्थिती कायम आहे. एकिकडे नवी मुंबईकर थंडीची वाट पाहत असतानाच त्यांना अवकाळी पावसाला सामोरे जावे लागले. तर, आज ८ ते ११ या वेळेत सूर्यग्रहण पाहता येणार होते. मात्र, ढगाळ वातावरण असल्यामुळे नवी मुंबईतील खगोलशास्त्र प्रेमींच्या सूर्यग्रहण पाहण्याच्या इच्छेवर पाणी फिरले.
हेही वाचा - सुर्यग्रहण हा नैसर्गिक अविष्कार, ग्रहणाचे निरीक्षण करून त्यामागचे विज्ञान समजून घ्यावे - दा. कृ. सोमण
हेही वाचा - राज्यसरकारची 10 रुपयांची थाळी म्हणजे बोलाचीच कडी बोलाचाच भात- केशव उपाध्ये