ETV Bharat / state

निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे लग्नाळू त्रस्त.. मुंबईत ३५ लग्न समारंभ अडचणीत - nerul

सभागृह आरक्षित करून देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या ३५ कुटुंबातील नागरिकांना आता लग्नासाठी नवीन सभागृहाचा शोध घ्यावा लागत आहे.

पर्यायी सभागृह देण्याची कुटुंबियांची मागणी
author img

By

Published : Mar 26, 2019, 10:31 AM IST

नवी मुंबई - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नेरुळ येथील आगरी कोळी भवन निवडणूक कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २० एप्रिल ते २५ मेपर्यंत आरक्षित केलं आहे. तब्बल दीड महिना हे सभागृह आरक्षित असल्याने या कालावधीत याठिकाणी होणारे लग्नसमारंभांचे काय होणार?, हा मोठा प्रश्न समोर येत आहे.

सुलेमान शेख (वधूचे वडील) यांनी पर्यायी सभागृह देण्याची विनंती केलीय

या भवनामध्ये निवडणुकीच्या कालावधीत ३५ लग्नसमारंभ होणार आहेत. जे ६ महिन्याआधीपासून आरक्षित करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आगरी कोळी भवन निवडणूक कामासाठी आरक्षित केल्याने या सर्व कुटुंबांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सभागृह आरक्षित करून देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या ३५ कुटुंबातील नागरिकांना आता लग्नासाठी नवीन सभागृहाचा शोध घ्यावा लागत आहे. यातील अनेक कुटुंबांनी लग्न पत्रिका देखील वाटल्या असून आता ऐनवेळी नवी सभागृह भेटणे देखील शक्य होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. प्रशासनाने आता पर्यायी व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.

Anc/vo-: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नेरुळ येथील आगरी कोळी भवन निवडणूक कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 20 एप्रिल ते 25 मे पर्यंत आरक्षित केलय. तब्बल दीड महिना हे सभागृह आरक्षित केल्याने या कालावधीत याठिकाणी होणारे लग्नसमारंभाच काय होणार हा मोठा प्रश्न समोर येत आहे. 20 एप्रिल ते 25 मे च्या दरम्यान 35 लग्नसमारंभ याठिकाणी होणार आहेत जे 6 महिन्या आधी पासून आरक्षित करण्यात आलेत. परंतु ऐनवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आगरी कोळी भवन निवडणूक कामासाठी आरक्षित केल्याने या सर्व कुटुंबांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 6 महिने आधी सभागृह आरक्षित करून देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे या 35 कुटुंबातील नागरिकांना आता लग्नासाठी नवीन सभागृहाचा शोध घ्यावा लागत आहे. यातील अनेक कुटुंबांनी लग्न पत्रिका देखील वाटल्या असून आता ऐनवेळी नवी सभागृह भेटणं देखील शक्य होत नसल्याने नागरिक संतप्त होत असून प्रशासनाने आता पर्यायी व्यवस्था करून द्यावी अशी मागणी लग्नासाठी आरक्षित केलेल्या कुटुंबातील व्यक्तीकडून करण्यात येतेय.

Byte-: सुलेमान शेख (वधू चे वडील)

Feed send what’s app

Pls check it
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.