नवी मुंबई : पनवेल महापालिका क्षेत्रात गुरुवारी 44 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 55 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
गुरुवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेलमधील 15, कामोठ्यातील 13, खारघरमधील 8, नवीन पनवेलमधील 3, कळंबोलीतील 3, तसेच आसुडगाव आणि तळोजा मध्ये प्रत्येकी एक अशा रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यत नोंद झालेल्या पनवेल महापालिका क्षेत्रातील एकूण 861 कोरोनाबाधित रूग्णांपैकी 596 रूग्ण बरे होऊन घरी परतले असून, 36 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात 229 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
गुरुवारी दिवसभरात ५५ जणांना डिस्चार्ज..
गुरुवारी पनवेल महापालिका क्षेत्रातील 55 जण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये कामोठ्यातील 20, नवीन पनवेलमधील 12, खारघरमधील 9, कळंबोलीतील 8 तसेच पनवेलमधील 6 रूग्णांचा समावेश आहे.
हेही वाचा : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे सर्वाधिक बळी; 97 जणांचा मृत्यू तर १,५४० नव्या रुग्णांची नोंद..