नवी मुंबई : पनवेल महापालिका क्षेत्रात रविवारी ४४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, ३५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच खारघरमधील दोघांचा आणि खिडूकपाडा येथील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात, आज आढळलेल्या रुग्णांमध्ये नवीन पनवेलमधील १०, कामोठ्यातील ९, कळंबोलीतील ९, खारघरमधील ७, पनवेलमधील ७, तळोजा वसाहत आणि आसुडगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका क्षेत्रातील एकूण ९७२ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ६७३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ४२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे २५७ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत.
रविवारी ३५ जणांना डिस्चार्ज..
आज पनवेल महापालिका क्षेत्रातील ३५ जण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये कळंबोलीतील १५, खारघरमधील ७, नवीन पनवेलमधील ६, कामोठ्यातील ४ तसेच पनवेलमधील ३ रूग्णांचा समावेश आहे.
हेही वाचा : पनवेलमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव; 'मेट्रोपोलीस' लॅब करणार साडेचार कोटीच्या मोफत चाचण्या