ETV Bharat / state

ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंगरुम बाहेर जादू-टोण्याचा संशय; काँग्रेस उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा गोंधळ

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम यंत्रे ठेवलेल्या स्ट्रॉंग रुमच्या बाहेर एका कारमध्ये काही व्यक्ती होमहवन करीत असल्याचे आढळून आले. त्यानंतर काँग्रेस उमेदवारासह कार्यकत्यांनी जादू टोण्याचा संशय घेत गोंधळ घातला.

author img

By

Published : May 7, 2019, 12:14 PM IST

ठाणे

ठाणे - भिवंडी लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम यंत्रे ठेवलेल्या स्ट्रॉंग रुमच्या बाहेर एका कारमध्ये काही व्यक्ती होमहवन करीत असल्याचे आढळून आले. त्यानंतर काँग्रेस उमेदवारासह कार्यकत्यांनी जादू टोण्याचा संशय घेत गोंधळ घातला. त्या कार मालकांना अडवीत घडलेल्या प्रकारचा जाब विचारला असता, त्यांनी उडवा-उडावीची उत्तरे दिल्याने काँग्रेस कार्यकत्यांचा संशय अधिकच बळावला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करीत या प्रकरणावर पडदा पाडला.

ठाणे

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदान २९ एप्रिल रोजी पार पडले. त्यानंतर सहाही विधानसभा क्षेत्रातील ईव्हीएम यंत्रे मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील एलकुंदे येथील प्रेसिडेन्सी स्कूल या ठिकाणी बनविण्यात आलेल्या स्ट्रॉंग रुममध्ये ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस, राज्य राखीव पोलीस, स्थानिक पोलीस अशी तीन स्तरावरील सुरक्षा यंत्रणेचा जागता पहारा ठेवण्यात आला आहे. त्यातच सीसीटीव्हीवर नजर ठेवण्यासाठी काँग्रेस उमेदवारांनीही आपले कार्यकर्ते पहारेकरी म्हणून या ठिकाणी नेमले आहेत. तर याच शाळेच्या प्रवेश द्वारावर असलेल्या दुसऱ्या इमारतीमध्ये शाळा व्यवस्थापनाचे कार्यालय असून त्या ठिकाणी जाण्यास कोणासही मज्जाव नसल्याने त्या ठिकाणी ये-जा सुरु आहे.

या शाळेचे व्यवस्थापक महावीर जैन यांना भेटण्यासाठी काल सायंकाळी श्रीकांत पंदिरे व त्यांचे दोन साथीदार आले होते. चर्चा झाल्यांनतर प्रवेश दारापासून काही अंतरावर उभ्या इनोव्हा कार (एमएच ०४ ईएफ २३१५) मध्ये बसून होमहवनास सुरुवात केली. याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्थानिक युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजय पाटील यांना समजताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांची कार अडवून कारची तपासणी केली. त्यावेळी कारच्या मागील बाजूस होमहवन सामुग्री आढळून आल्याने तेथील पोलिसांना बोलावून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

त्यानंतर काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे हे सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्यांनी तुम्हाला होमहवन करण्यासाठी हीच जागा मिळाली का? असा प्रश्न करीत त्यांना खडसावले. तर कार मालक श्रीकांत पंदिरे यांनी आपण गोदाम खरेदीच्या चर्चेसाठी महावीर जैन यांच्याकडे आलो होतो. मात्र, माघारी जाताना सूर्यास्त झाल्याने कारमध्येच होमहवन केले. त्यामागे कोणताही दुसरा हेतू नसल्याचे सांगत त्यांनी विनवणी केली. त्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करीत त्यांना सोडून दिले.

दरम्यान, ज्या शाळेत ईव्हीएम यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंगरूम आहेत. त्या शाळेच्या आवारातील संपूर्ण परिसर निवडणूक यंत्रणेने ताब्यात घेतला आहे. मात्र, असे असताना शाळेच्या इमारतीसाठी वेगळा न्याय का? असा सवाल काँग्रेस कार्यकत्यांनी उपस्थित करीत, ज्यांना हरण्याची भीती असते, तेच अशा प्रकाराचे होमहवन करून जादूटोण्याचा आधार घेत असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनीही संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवणे गरजेचे असून शाळेच्या कार्यालयात बसून आपले व्यावसायिक व्यवहार करणाऱ्या शाळा व्यवस्थापकासह इमारतीमध्ये इतरही व्यक्तींना प्रवेश करण्यास पायबंद घातला पाहिजे, अशी मागणी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजय पाटील यांनी केली.

ईव्हीएम यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग  रूमच्या बाहेर जादू टोण्याचा संशय; कॉग्रेस उमेदवारांसह कार्यकत्यांचा गोंधळ

ठाणे :- भिवंडी लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग  रूमच्या बाहेर एका कारमध्ये काही व्यक्ती होमहवन करीत असल्याचे आढळून आले. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जादू टोण्याचा संशय घेत, कॉग्रेस उमेदवारासह कार्यकत्यांनी गोंधळ घालत. त्या कार मालकांना अडवीत घडलेल्या प्रकारचा जाब विचारला असता, त्यांनी उडवा उडावीची उत्तरे दिल्याने कॉग्रेस कार्यकत्यांचा संशय त्यांच्यावर अधिक बळावलान होता. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करीत या प्रकरणावर पडदा पडला.

 भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदान २९ एप्रिल रोजी पार पडले. त्यानंतर सहा हि विधानसभा क्षेत्रातील मतदान ईव्हीएम यंत्र मुंबई – नाशिक महामार्गावरील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील एलकुंदे येथील प्रेसिडेन्सी स्कुल या ठिकाणी बनविण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहे. या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस, राज्य राखीव पोलीस, स्थानिक पोलीस असा तीन स्तरावरील सूरक्षा यंत्रणेचा जगता पहारा ठेवण्यात आला आहे. त्यातच सीसीटीव्हीवर नजर ठेवण्यासाठी काँग्रेस उमेदवारांनीही आपले कार्यकर्ते पहारेकरी म्हणून या ठिकाणी नेमले आहेत. तर याच शाळेच्या प्रवेश दारावर असलेल्या दुसऱ्या इमारतीमध्ये शाळा व्यवस्थापनाचे कार्यालय असून त्या ठिकाणी जाण्यास कोणासही मज्जाव नसल्याने त्या ठिकाणी ये - जा सुरु आहे. या शाळेचे व्यवस्थापन महावीर जैन याना भेटण्यासाठी काल सायंकाळी श्रीकांत पंदिरे व त्यांचे दोन साथीदार आले होते. चर्चा झाल्यांनतर प्रवेश दारापासून काही अंतरावर उभ्या इनोव्हा कार क्रमांक MH 04 EF 2315मध्ये बसून होमहवनास सुरवात केली. याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्थानिक युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजय पाटील याना समजताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत त्यांची  कार अडवून कारची तपासणी केली. त्यावेळी  कारच्या मागील बाजूस होमहवन सामुग्री आढळून आल्याने तेथील पोलिसांना बोलावून गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यानंतर काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे  हे सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्यांनी तुम्हाला होमहवन करण्यासाठी हीच जागा मिळाली का ? असा प्रश्न करीत त्यांना भंडावून सोडले. तर कार मालक श्रीकांत पंदिरे यांनी आपण गोदाम खरेदीच्या चर्चेसाठी महावीर जैन यांच्याकडे आलो होतो. मात्र माघारी जाताना सूर्यास्ताची झाल्याने कार मध्येच होमहवन केले. त्यामागे कोणताही दुसरा हेतू नसल्याचे सांगत विनवणी केली. त्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करीत त्यांना सोडून देण्यात आले.

दरम्यान, ज्या शाळेत ईव्हीएम यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम आहे. त्या शाळेच्या आवारातील संपूर्ण परिसर निवडणूक यंत्रणेने ताब्यात घेतला. मात्र असे असताना शाळेच्या इमारतीसाठी वेगळा न्याय का ? असा सवाल कॉग्रेस कार्यकत्यांनी उपस्थित करीत, ज्यांना हरण्याची भीती असते तेच अश्या प्रकाराने होमहवन करून जादूटोण्याचा आधार घेत असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनीही संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवणे गरजेचे असून शाळेच्या कार्यालयात बसून आपले व्यावसायिक व्यवहार करणाऱ्या शाळा व्यवस्थापकासह इमारतीमध्ये इतरही व्यक्तींना प्रवेश करण्यास पायबंद घातला पाहिजे अशी मागणी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र  प्रदेश सरचिटणीस विजय पाटील यांनी केली आहे.

 ftp folder ..  bhiwandi loksbha,jadutona,7.5.19 

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.