ETV Bharat / state

'त्या 12 आमदारांची काळजी खासदार राऊत यांनी करू नये' - political news

राज्यपाल नियुक्त त्या 12 आमदारांचे काय होणार?, असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला होता. यावर प्रत्युत्तर देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खासदार राऊत यांच्यावर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jul 5, 2020, 8:48 PM IST

Updated : Jul 7, 2020, 7:00 AM IST

ठाणे - विधानपरिषदेवर नुकतीच 12 आमदारांची राज्यपालांनी नियुक्ती केली. त्याची काळजी खासदार संजय राऊत यांनी करू नये. राऊत यांनी महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची काळजी करावी, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. कोरोना रुग्णांना अजूनही उपचार मिळत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. कोरोना रुग्णांचे काय होणार? हा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला असता तर मला आनंद झाला असता, असा टोलाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला.

बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

नुकताच विधानपरिषदेवर 12 आमदारांची नियुक्ती राज्यपालांनी केली. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा समावेश आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त त्या 12 आमदारांचे काय होणार?, असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला. यालाच प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांना टोला लगावला.

ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेचा आढावा घेतल्यानंतर उल्हासनगर शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फडणवीस हे उल्हासनगरमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकरांशी बोलताना संजय राऊत यांच्यावर त्यांनी बोचरी टीका केली. आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या महापालिकांना राज्य सरकारने मदत करायला हवी त्याचबरोबर उल्हासनगर महापालिकेत प्रशासन बरोबरच राज्य सरकार कोणतीही व्यवस्था करत नसल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

तर उल्हासनगर महापालिकेकडे असलेली आरोग्य व्यवस्था अतिशय तोकडी असून शहरात महापालिका प्रशासनाला कोरोनाची चाचणीचे प्रमाण वाढवावे लागेल, त्याचबरोबर आयसीयू (अति दक्षता विभाग) खाट, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरची व्यवस्था कोविड रुग्णालयात करावी लागेल, शिवाय 24 तासांमध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांचे अहवाल आले पाहिजेत, त्यासाठी खासगी लॅब सोबत करार करावा, अशा प्रकारची सुचना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी महापालिका प्रशासनाला केल्या.

हेही वाचा - ठाण्यात महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता, काँग्रेसकडून सेना अन् राष्ट्रवादी धारेवर

Last Updated : Jul 7, 2020, 7:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.