ठाणे - कांद्याच्या आहेराने विवाहाच्या समारंभात धमाल उडवून दिली. मित्राने आहेर म्हणून आणलेल्या गिफ्ट बॉक्समध्ये कांदे पाहताच नववधूला हसू आवरे ना. नववधूला हसताना पाहून नवऱ्या मुलाच्या तोंडावर हास्य फुलले होते. व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर भलताच व्हायरल झाला आहे.
हेही वाचा - रितेशच्या वाढदिवशी जेनेलियाची रोमॅन्टिक पोस्ट, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
देशभरात कांद्याच्या किंमतीत दिवसागणिक दर चढ उतार होत असल्याने सर्वसामान्य गृहिणीच्या डोळ्यात अश्रू आणले आहे. यापूर्वी डोळ्यातून अश्रू कांदा चिरताना येत होते. आता नुसते भाव ऐकून गृहणीच्या डोळ्यात अश्रू येताना दिसत आहे. त्यातच भिवंडी शहरातील धामणकर नाका येथे राहणारे जितेंद्र अशोक गुप्ता यांच्या विवाहाच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम २ दिवसापूर्वी भिवंडीतील पालिकेच्या तरंगतलावच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते.
समारंभात वऱ्हाडी मंडळी वरवधूंना आशीर्वाद व आहेर देण्यासाठी उपस्थित होते. त्यावेळी बबलू गुप्ता नावाच्या मित्राने वर-वधूला आहेरात चक्क कांदा दिल्याने समारंभात एकच चर्चेचा विषय ठरला.
हेही वाचा - आघाडी सरकारचं अखेर ठरलं; 'या' तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार