नवी मुंबई - पुण्याच्या दिशेने जाणारा एक पिकअप टेम्पो पोलिसांनी वाशी टोल नाक्यावर जप्त केला आहे. या टेम्पोतून 1000 किलो चांदी जप्त करण्यात आली. त्यावर जीएसटी भरली नसल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. संबधित टेम्पो मुंबईपासून पुण्याच्या दिशेने जात असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक मेंगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. संबधित टेम्पो मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असल्याची प्राथमिक माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली. पीकअप टेम्पोच्या खालीच्या भागात ही चांदी लपवली होती. त्यासोबत अनेक अनेक नामवंत ज्वेलर्सच्या नावाच्या पावत्या असून जीएसटी किती भरला आहे, यांची नोंद पोलिसांना सापडली नाही.
चांदीच्या अनेक वस्तू बिस्कीटं, पैंजण, साखळ्या असे दागिने सोबत सापडले आहेत. हा टेम्पो मुंबईहून पुणे व पुण्याहून अहमदाबाद व इतर ठिकाणी जाणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून मिळाली आहे.