ठाणे - एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या भाच्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरच्या सह्याद्री नगरमध्ये घडली आहे. या प्रकरणात उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने फिल्मी स्टाईलने अपहरणकर्त्याला बेड्या ठोकल्या. सूरज सिंग असे अपहरणकर्त्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या सह्याद्री नगरमध्ये शारदा सिंग या राहतात. गुरुवार संध्याकाळी त्यांचा मुलगा भावेश (वय ३) हा अचानक गायब झाला. सायंकाळ झाली तरी तो कुठे आढळून आला नसल्याने शारदा यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. यानंतर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण पथकाने अपहरण कर्त्याच्या आईची चौकशी सुरू केली. याच दरम्यान अपहरण झालेल्या मुलाच्या मावशीला एका व्यक्तीचा फोन आला. त्याने मावशीला कुर्ला रेल्वे स्थानक येथे एकटी येण्यास सांगितले. तू आली नाहीस भावेश ह्याला ठार मारेन, अशी धमकी त्याने दिली.
पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत कुर्ला रेल्वे स्थानक गाठले. तेवढ्यात सूरजने तरुणीला विक्रोळी रेल्वे स्थानकात बोलावले. मात्र, पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण आरोपीला लागल्याने त्याने तेथून पळ काढला. त्यानंतर पुन्हा त्याने मोबाईलवरून संपर्क करून चिमुरड्याच्या मावशीला ठाणे रेल्वे स्थानकाच्या पाच नंबर फलाटावर येण्यास सांगितले. त्यावेळी पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला असता अपहरणकर्ता ठाणे स्थानकातील पाच नंबर फलाटावर इंडिकेटर खाली उभा असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी तरुणीला आरोपी सूरजला भेटण्यास पाठवले. ती सूरजला भेटल्यावर चिमुरड्याला आपल्या ताब्यात घेतले. त्याच सुमारास पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अपहरणकर्त्याला पकडून बेड्या ठोकल्या. तर चिमुरड्याला पालकांच्या स्वाधीन केले.
एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या भाच्याचे अपहरण; उल्हासनगरातील धक्कादायक घटना - ठाणे
एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या भाच्याचे अपहरण करण्यात आल्याची अनोखी घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.
ठाणे - एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या भाच्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरच्या सह्याद्री नगरमध्ये घडली आहे. या प्रकरणात उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने फिल्मी स्टाईलने अपहरणकर्त्याला बेड्या ठोकल्या. सूरज सिंग असे अपहरणकर्त्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या सह्याद्री नगरमध्ये शारदा सिंग या राहतात. गुरुवार संध्याकाळी त्यांचा मुलगा भावेश (वय ३) हा अचानक गायब झाला. सायंकाळ झाली तरी तो कुठे आढळून आला नसल्याने शारदा यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. यानंतर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण पथकाने अपहरण कर्त्याच्या आईची चौकशी सुरू केली. याच दरम्यान अपहरण झालेल्या मुलाच्या मावशीला एका व्यक्तीचा फोन आला. त्याने मावशीला कुर्ला रेल्वे स्थानक येथे एकटी येण्यास सांगितले. तू आली नाहीस भावेश ह्याला ठार मारेन, अशी धमकी त्याने दिली.
पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत कुर्ला रेल्वे स्थानक गाठले. तेवढ्यात सूरजने तरुणीला विक्रोळी रेल्वे स्थानकात बोलावले. मात्र, पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण आरोपीला लागल्याने त्याने तेथून पळ काढला. त्यानंतर पुन्हा त्याने मोबाईलवरून संपर्क करून चिमुरड्याच्या मावशीला ठाणे रेल्वे स्थानकाच्या पाच नंबर फलाटावर येण्यास सांगितले. त्यावेळी पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला असता अपहरणकर्ता ठाणे स्थानकातील पाच नंबर फलाटावर इंडिकेटर खाली उभा असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी तरुणीला आरोपी सूरजला भेटण्यास पाठवले. ती सूरजला भेटल्यावर चिमुरड्याला आपल्या ताब्यात घेतले. त्याच सुमारास पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अपहरणकर्त्याला पकडून बेड्या ठोकल्या. तर चिमुरड्याला पालकांच्या स्वाधीन केले.
एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या भाच्याचे अपहरण; उल्हासनगरातील धक्कादायक घटना

Conclusion: