ETV Bharat / state

दोन महिन्यानंतर होणार होते सेवानिवृत्त, ..पण काळ आला होता - कल्याण डोंबिवली महापालिका

आजारपणाने अंथरुणात खिळलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेतील सफाई कामगाराच्या घरी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आजारपणामुळे त्यांना आगीपासून स्वतः बचाव करता न आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. चक्रपाणी केशवन, असे मृत व्यक्तीचे नाव असून ते दोन महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होते.

मृतदेह नेताना
मृतदेह नेताना
author img

By

Published : Feb 12, 2020, 5:47 PM IST

ठाणे - घरातील विद्युत वाहक वायरींमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने घराला आग लागून एकाचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथ शहरातील पश्चिमेकडील स्वामीनगर परिसरात घडली.

घटनास्थळावरुन माहिती देताना पोलीस

चक्रपाणी केशवन, असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृत चक्रपाणी केशवन हे कल्याण डोंबिवली महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. काही महिन्यांपासून ते आजारी असल्याने घरातच अंथरुणात खिळून होते. त्यातच त्यांच्या घराला दुपारच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली होती. यावेळी आजारी असलेले केशवन हे झोपले होते.

आजारपणात असल्याने आग लागल्यानंतर त्यांना घराबाहेर पडता आले नाही. त्यामुळे आगीत होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. विशेष म्हणजे मृत चक्रपाणी केशवन राहत असलेल्या स्वामीनगर वस्तीत दाटीवाटीने घरे आहेत. मात्र, वेळेतच आग विझवल्याने बाजूच्या घरांना आगीची झळ बसली नाही. मृत केशवन हे कल्याण डोंबिवली महापालिकेत सफाई कामगार असून दोन महिन्यांनी ते निवृत्त होणार होते. दरम्यान, केशवन यांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली असून याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात आगीची व अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा - हाजी मलंग यात्रेत दोन सख्ख्या भावांना अटक; 13 महागड्या मोबाईलसह गांजा जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.