ठाणे : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील कचेरी पाडा येथे राहणारा उदय पवार रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. 5 मे रोजी मध्यरात्री बारा वाजता त्यांनी रिक्षा उभी केल्यानंतर त्यांचे स्वतःच इन्स्टाग्राम पेज उघडले असता, त्यांना इन्स्टाग्राम पेजवर दिसले की, कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह कमेंट लिहून पोस्ट केली होती. avesh_id ने पोस्ट केली आहे. ज्या पोस्टमध्ये शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह शब्द लिहिले आहेत. जे पाहून उदय पवार यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने त्यांनी रात्रीच्या सुमारास शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. परंतु सुरवातीला पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेनेचे शहरप्रमुख प्रकाश पाटील (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यासह हिंदू संघटनेचे लोक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात पोहोचले. तसेच तातडीने अल्पवीयन मुलाला अटक करण्याची मागणी लावून धरली.
पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला : त्यानंतर उशिरा रात्री शांतीनगर पोलिसांनी उदय पवार यांच्या तक्रारीवरून शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यां 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर भादंवि कलम 153A, 295A अन्वये गुन्हा दाखल करून त्याला काही तासांतच ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. मात्र दुसऱ्या दिवशी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. दुसरीकडे पोलिसांनी संवेदेशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावणारी पोस्ट : यापूर्वीही जून 2022 रोजी भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या आक्षेपाहार्य वक्तव्यावरून भिवंडी शहरातील मुस्लिम धर्मियांमध्ये तेढ निर्माण झाला होता. भिवंडी शहर पोलीस ठाण्यात खटला सुरू असतानाच तरुणाने एका व्हाट्सअप ग्रुपवर मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावणारी पोस्ट व्हॉट्सअॅपवरून प्रसारित केल्याने त्या तरुणावर निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. भिवंडी शहरात तणावाचे वातावरण पसरले. मात्र पोलीस प्रशासनाने तातडीने शर्मा व जिंदलवर गुन्हे दाखल करत शहरात शांतता राखण्यात यश आले.