मुंबई - प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी परिचरिकांनी आजपासून (सोमवार) काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मुंबईसह 24 जिल्ह्यात आज सकाळी 8 ते 10 या वेळेत परिचरिकांनी रुग्णालय आवारात निदर्शने करत आंदोलन केले. तर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. तसेच 24 जूनपर्यंत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर 25 जूनपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचरिका संघटनेने यावेळी दिला आहे.
परीचारिकांच्या आंदोलनाला सुरुवात; मुंबईसह 25 जिल्ह्यात दोन तास निदर्शने - परीचारिकांचे आंदोलन
प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात अन्यथा 21 जूनपासून काम बंद आंदोलन करू, असा इशारा संघटनेने दिला होता. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण संचालक यांना पत्रही पाठवले.
परीचारिकांच्या आंदोलनाला सुरुवात