ETV Bharat / state

पोलीस आणि पत्रकारांची होणार मोफत कोव्हीड चाचणी; खासदार श्रीकांत शिंदे, वनरुपी क्लिनिकचा स्तुत्य उपक्रम

ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला सुरुवात झाली. सर्दी-तापासारखी लक्षणे व इतर कोरोनासदृश्य लक्षणे असलेल्या संशयित पोलीस- पत्रकार यांची खाजगी लॅबच्या माध्यमातून मोफत कोव्हीड टेस्ट होणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

पोलीस आणि पत्रकारांची होणार मोफत कोव्हीड चाचणी

author img

By

Published : Apr 8, 2020, 7:29 AM IST

Updated : Apr 8, 2020, 2:38 PM IST

ठाणे - कोरोनाच्या संक्रमणातदेखील सतत कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस आणि पत्रकारांची मोफत कोव्हीड तपासणी करणार असल्याची घोषणा मंगळवारी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केली. ठाणे, कळवा, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथील पोलीस आणि पत्रकारांसाठी ही सुविधा डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन , वनरुपी क्लिनिक आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने देण्यात येणार आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे डॉक्टरच्या भूमिकेत दिसून आले व त्यांनी स्वतः पोलिसांची व पत्रकारांची तपासणी केली.

पोलीस आणि पत्रकारांची होणार मोफत कोव्हीड चाचणी

ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला सुरुवात झाली. सर्दी-तापासारखी लक्षणे व इतर कोरोनासदृश्य लक्षणे असलेल्या संशयित पोलीस- पत्रकार यांची खाजगी लॅबच्या माध्यमातून मोफत कोव्हीड टेस्ट होणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. थर्मल स्कॅनरच्या माध्यमातून स्वतः डॉ शिंदे यांनी कर्तव्यावर असलेल्या सर्व पोलिसांची तपासणी केली. तर, कोरोनासदृश लक्षणे आढळलेल्या पोलिसांची कोव्हीड तपासणी करण्यासाठी लॅबोरेटरीजच्या कर्मचाऱ्यांस तत्काळ बोलावून तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.

ठाणे शहरातील नितीन कंपनी सिग्नल येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची तपासणी करून मंगळवारी या उपक्रमाला सुरुवात झाली. सकाळपासून या फिरता दवाखान्यांतर्गत एकाच दिवसात 200 पोलीस आणि पत्रकारांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यात सर्दी-ताप लक्षणे असलेल्या दोन कोरोना संशयित पोलिसांची कोव्हीड टेस्टदेखील करण्यात आली. मंगळवारी सायंकाळपर्यंत या पोलिसांचे रिपोर्ट उपलब्ध झाल्यानंतर आवश्यकता असल्यास पुढील उपचारासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.

Last Updated : Apr 8, 2020, 2:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.