ETV Bharat / state

ठाण्यात चक्री पाळण्यातून पडल्यान नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू

ही घटना भिवंडीतील समदनगर बगीचा येथील आनंदमेळ्यात घडली आहे. या अपघाताच्या  घटनेनंतर चक्री पाळणा चालक पसार झाला आहे. रमजान सारख्या आनंदी सणाच्या दिवशीच मुस्कानच्या मृत्यूने कुटुंबीयांसह परिसरात शोककळा पसरली आहे .

मयत मुस्कान मोहम्मद शमीम सिध्दीकी
author img

By

Published : Jun 7, 2019, 12:55 PM IST

ठाणे - ईद निमित्त घरातील वडीलधाऱ्यांकडून मिळालेल्या ईदी रुपी बक्षिस रक्कमेतून आनंदमेळ्यातील चक्री पाळण्यात खेळण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलीचा चक्री पाळण्यातून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मुस्कान मोहम्मद शमीम सिध्दीकी असे मृत मुलीचे नाव आहे.

Dead Muskan Sidhhiki
मयत मुस्कान सिध्दीकी

ही घटना भिवंडीतील समदनगर बगीचा येथील आनंदमेळ्यात घडली आहे. या अपघाताच्या घटनेनंतर चक्री पाळणा चालक पसार झाला आहे. रमजान सारख्या आनंदी सणाच्या दिवशीच मुस्कानच्या मृत्यूने कुटुंबीयांसह परिसरात शोककळा पसरली आहे .

भिवंडी शहरातील रामेश्वर मंदिर परीसरातील राहणारी मुस्कान ही नऊ वर्षांची मुलगी आपल्या चुलत बहिणींसोबत समदनगर बगीचा येथील आनंदमेळ्यात दुपारी एक वाजता गेली. तेथील हाताने फिरवल्या जाणा-या चक्री पाळण्यात ती बसली. त्यानंतर पाळणा वर गेला असता तीचा घाबरुन तोल गेला व ती खाली पडत असताना पाळण्यातील इतर दालनावर आदळून तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. त्यानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. मात्र, चक्री पाळणाचालकाने तेथून पलायन केले.

या दुर्घटनेनंतर मुलांनी घरी येऊन मुस्कानच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली असता, त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मुस्कानला स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांनी तिला त्याठिकाणी मृत घोषित केले. त्यानंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. चक्री पाळणाचालकाने खबरदारी घेत तात्काळ पाळणा थांबवला असता, अथवा तिला वैद्यकीय मदत उपलब्ध करुन दिली असती तर आपली मुलगी बचावली असती. तिच्या मृत्यूस पाळणा चालकाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप मुस्कानचे वडील मोहम्मद शमीम सिध्दीकी यांनी केला आहे.

पाळणा फिरत असताना पाळण्यात बसलेल्या मुस्कानचे डोके लोखंडी खांबावर आदळले. नंतर ती पाळण्यात अटकल्याने ती जखमी झाली. त्यानंतर पाळणा चालकाने तिला खाली उतरवून तेथून पलायन केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी महेफुज अन्सारी व रुबिना या मुलांनी सांगितली आहे.

या दुर्घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्घटनेस पाळणाचालक जबाबदार असल्याची तक्रार मुस्कानच्या पालकांनी केली आहे. पोलिसांनी या दुर्घटनेची कसून चौकशी सुरू केली असून तपासाअंती पाळणाचालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कोकाटे यांनी दिली आहे.

दरम्यान, सणासुदीच्या दिवसात अशा पद्धतीने पाळणे, यांत्रिक पाळणे मोठ्या प्रमाणावर शहरात ठिकठिकाणी लागत असल्याने त्यावर पोलिसांनी नियंत्रण ठेवण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

ईद निमित्त मैत्रिणींसह चक्री पाळण्यात खेळण्यासाठी गेलेल्या मुलीचा पाळण्यातून पडुन दुर्दैवी मृत्यु 

ठाणे :- रमजान ईद म्हंटल की लहानग्यांची चंगळ, घरातील वडीलधा-यांकडुन मिळालेल्या ईदी रुपी बक्षिस रक्कमेतुन आनंदमेळ्यात चक्री पाळण्यात खेळण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलीचा चक्री पाळण्यातुन पडुन दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.  

हि घटना भिवंडीतील समदनगर बगीचा येथील आनंद मेळ्यात घडली आहे. मुस्कान मोहम्मद शमीम सिध्दीकी असे मयत मुलीचे नाव आहे. या अपघाताच्या दुर्दैवी घटनेनंतर चक्री पाळणा चालक पसार झाला आहे. रमजान सारख्या आनंदी सणाच्या दिवशीच मुस्कानच्या दुर्दैवी मृत्युने कुटुंबियांसह परिसरात शोककळा पसरली आहे .

रमजान ईद म्हणजे मुस्लिम धर्मीयांची जणु दिवाळी खास करुन लहान मुले मुली नवीन कपडे घालुन या सणाचा आनंद घेत असताना ,लहान मुलांना मोठ्यांकडुन ईदीच्या रुपाने बक्षिसी रक्कम मिळते. मग ही रक्कम घेऊन लहानग्यांचा मोर्चा वळतो तो खाऊ खाण्याकडे आनंद मेळ्यात खर्च करण्याकडे भिवंडी शहरातील रामेश्वर मंदीर परीसरातील राहणारी मुस्कान मो शमीम सिध्दीकी ही नऊ वर्षांची मुलगी आपल्या चुलत बहिणीं सोबत समदनगर बगीचा येथील आनंद मेळ्यात दुपारी एक वाजता गेली. तेथील हाताने फिरविल्या जाणा-या चक्री पाळण्यात ती बसल्यावर तीवर गेली असता तीचा घाबरुन तोल गेला व ती खाली पडत असताना पाळण्यातील इतर दालनावर आदळून तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने ती जखमी रक्ताच्या थारोळ्यात पडली असता चक्री पाळणा चालविणा-याने तेथुन पलायन केले.

 या दुर्घटने नंतर मुलांनी घरी येऊन मुस्कानच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेत आपल्या जखमी मुस्कानला स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारा करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांनी ती मयत झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात या घटनेची अपघाती मृत्यु म्हणुन नोंद करण्यात आली आहे. चक्री पाळणा चालकाने खबरदारी घेत तात्काळ पाळणा थांबविला असता ,अथवा तिला वैद्यकीय मदत उपलब्ध करुन दिली असती तर आपली मुलगी बचावली असती ,तिच्या मृत्युस पाळणा चालकाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप मुस्कान चे वडील मोहम्मद शमीम सिध्दीकी यांनी केला आहे. 

 हाताने धक्का देत चालविल्या जाणाऱ्या या चाकरी पाळण्यास धक्का देण्यासाठी पाळणा चालक वरती चढून पाळण्यास लटकत खाली येत पुन्हा वर चढून पाळण्यास लटकत जोरात धक्का देत असे , हे करीत असताना पाळण्यात बसलेली मुस्कान हिचे डोके लोखंडी खांबावर आदळत ते पाळण्यात अटकल्याने तिचा अति रक्तस्राव सुरु होत ती जखमी झाली असता पाळणा चालकाने तिला खाली उतरवून तेथून पलायन केले अशी माहिती प्रत्यक्षदर्शी  महेफुज अन्सारी व रुबिना या मुलांनी सांगितली आहे.  या दुर्घटने बाबत शहर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून या दुर्घटनेस पाळणा चालक जबाबदार असल्या बाबत तक्रार पालकांनी केल्याने पोलिसांनी या दुर्घटनेची कसून चौकशी सुरु केली असून तपासाअंती पाळणा चालका वर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कोकाटे यांनी दिली आहे. दरम्यान सणासुदीच्या दिवसात अशा पद्धतीने पाळणे , यांत्रिक पाळणे मोठ्या प्रमाणावर शहरात ठिकठिकाणी लागत असल्याने त्यावर पोलिसांनी नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याची मागणी सर्वसामान्य नागरिकां कडून केली जात आहे .  

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.