ठाणे - पोलीस दलातील नऊ कर्मचारी शुक्रवारी करोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्या पोलिसांची संख्या ८० झाली आहे. तर ५ पोलीस अधिकारी आणि ५० पोलीस कर्मचाऱ्यांवर अद्याापही रूग्णालयात उपचार सुरू आहे.
ठाणे पोलीस दलात एकूण १५ अधिकारी आणि १२१ पोलीस कर्मचारी करोनाबाधित झाले होते. शुक्रवारी नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्या पोलिसांची संख्या ८० झाली आहे. यात १० पोलीस अधिकारी आणि ७० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उपचार घेत असलेले सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही करोनावर मात करतील, असा विश्वास ठाणे पोलिसांना आहे.