ठाणे - उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह आढळलेली स्कॉर्पिओ वापरणारे मनसुख यांच्या मृत्यूनंतर अनेक शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. त्या दृष्टीने तपास यंत्रणांकडून या प्रकरणातील काही घडामोडींचा तपास सुरू आहे. या प्रकरणात मनसुख हिरेन यांची स्कॉर्पियो गाडी अचानक विक्रोळी येथे बंद पडली, बंद पडल्यानंतर तिचे स्टेरिंग लॉक झाला आणि मग ती त्याच ठिकाणी सोडून हिरेन हे मनसोक्त मुंबईला निघून गेले. या सर्व बाबी तांत्रिक दृष्ट्या तपासल्या असता, या गाडीमध्ये ट्रॅकर लावला होता का? असा संशय उपस्थित होत आहे.
हिरेन यांच्या स्कॉर्पिओला जर ट्रॅक्रर लावला असेल, तरच अशा पद्धतीने गाडी कुठूनही कितीही अंतरावरून गाडी बंद करुण पुन्हा चालू करता येते. एखादी चिप जऱ आपल्या वाहनात लावली तर ती कुठे आहे. तिचा चालक गाडी कितीच्या स्पीडने गाडी चालवत आहे, तो एसी वापरतोय का? या सर्व बाबी ट्रॅकर लावणाऱ्या माणसाला माहिती पडतात. या ट्रॅक्ररची बाजारात 4 हजारा पासून 20 हजार रुपयांपर्यंत किंमत आहे. त्यामुळे अशा प्रकारचा ट्रॅकर मनसुख यांच्या स्कॉर्पियोला लावण्यात आला होता का? याचा शोध ही एनआयए ला घ्यावा लागणार आहे.
सॅम न्यूटन यांच्या मालकीच्या स्कॉर्पिओ गाडीचे मॉडिफिकेशनचे पैसे न दिल्याने ही कार मनसुख यांनी ठेवून घेतली होती. त्यानंतर ती गाडी सचिन वझे यांना वापरण्यास घेतली होती. पुढे ही गाड़ी मनसुख परत घेवून जातात. त्यानंतर कामानिमित्त मुंबईला जात असताना ती गा़डी रस्त्यात बंद होते. मग ती तिथेच सोडून गेल्यावर त्या रात्री ती गाडी चोरीला जाते. त्यानंतर ती गाडी दुसऱ्या दिवशी अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनसह मिळते. या प्रकरणी मनसुख यांची चौकशी होते, नंतर त्यांचा मृतदेह मिळतो असा या प्रकारणाचा घटनाक्रम आहे.
मनसुख यांच्या दुकानातही मिळतो ट्रॅकर
मनसुख हिरेन यांच्या क्लासिक मोटर्स या डेकोर शोरूम मध्ये वाहनाचे मॉडिफिकेशन ब्यूटी फिकेशन केले जाते. त्यासोबत वाहनात बदल करण्यात येतो, आता जेव्हा मनसुख यांचा मृत्यू झाल्यावर त्याचे शोरूम सुरु झाले आहे आणि त्यामधे अशा कामांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या दुकानात तशा प्रकारचा ट्रॅकरही मिळतो.
मनसुख यांच्या अपरोक्ष कोणी लावला होता का ट्रॅकर?
स्कॉर्पियो गाडी मनुसख वापरण्यापूर्वी सचिन वझे वापरत होते. मग तेव्हा या गाडीत ट्रॅक्रर लावला होता का? मग तो कोणी लावला? त्याचा ट्रॅकर ऑपरेटिंग कोणाकडे होते? या सर्व बाबी तपासाव्या लागणार आहेत. जर ट्रॅकर लावून काढला असेल तरी त्याचे पुरावे उपलब्ध होतात, असेही जाणकार सांगतात