ETV Bharat / state

NIA Raids : बनावट नोटांच्या पुरवठा प्रकरणांमध्ये 'एनआयए'चे मुंबईसह ठाण्यात छापे

बनावट नोटांच्या पुरवठ्या प्रकरणांमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेचा तपास सुरू केला आहे. बुधावारी एनआयए'चे छापे मुंबई तसेच ठाण्यातील काही भागात छापे टाकले आहेत. बनावट नोटांच्या प्रकरणांमध्ये दाऊद इब्राहिमच्या टोळीचा सहभाग असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्या आधारे हे धाडसत्र सुरू आहे.

NIA Raids
NIA Raids
author img

By

Published : May 12, 2023, 3:35 PM IST

ठाणे : बनावट नोटांच्या वितरण प्रकरणांमध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास करताना पुन्हा एकदा राष्ट्रीय तपास यंत्रणेने मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केलेले आहे. ही कारवाई होत असताना तपासामध्ये या बनावट नोटांच्या प्रकरणांमध्ये दाऊद इब्राहिमच्या काही लोकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाच्या तपासाची सुरुवात दोन वर्षांपूर्वी झाली होती.

एनआयए'चे छापे : राष्ट्रीय तपास यंत्रणेचा तपास सुरू असल्यामुळे या प्रकरणांमध्ये आणखी माहिती ठाणे पोलिसांकडून मिळू शकले नाही. कारण हा सर्व तपास राष्ट्रीय सुरक्षा संस्थेकडून केला जात आहे. दाऊद टोळीचा सहभाग बनावट भारतीय नोटांशी संबंधित फेब्रुवारी २०२३ रोजी या प्रकरणी असल्याचे प्राथमिक तपासात असून दोघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी १८ नोव्हेंबर २०२१ मध्ये ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात भादंवि, बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्या (यूएपीए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या वेळी रियाझ, नासीर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, दोघेही मुंबईचे रहिवाशी आहेत. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. एनआयएने या प्रकरणाच्या तपासाचा एक भाग म्हणून आरोपी संशयितांच्या अनेक मालमत्तांवर, बहुतेक घरे आणि कार्यालयांवर बुधवारी छापे टाकले. या छाप्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाप्रकरणी लवकरच संशयितांची चौकशी केली जाणार आहे.

दाऊद टोळीवर संशय : मागील अनेक वर्षांपासून दाऊद इब्राहिम यांच्या हस्तकांकडून भारतामध्ये बनावट नोटा चलनात आणल्या जात असल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेला होता आणि त्याच्याच तपासामध्ये लाखो रुपयांच्या बनावट नोटा देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत. भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न सुरू असल्याचे काही अधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले आहे.

  1. Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्या राजीनाम्यातून सगळ्यांना धडा मिळाला-अजित पवार
  2. Sharad Pawar for MVA stronger : महाविकास आघाडी मजबुतीची शरद पवारांची हाक, अजित पवारांच्या उपद्रवमूल्यावर प्रश्नचिन्ह
  3. CBSE Class 10 Results : सीबीएससी 10 वीचा निकाल जाहीर, जाणून घ्या कसा पहायचा दहावीचा निकाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.