ETV Bharat / state

MLA Ganesh Naik : आमदार गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार, पुढील सुनावणी 27 एप्रिलला - अटकेची टांगती तलवार

भाजपचे आमदार गणेश नाईक ( MLA Ganesh Naik ) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला असून नाईक अडचणी सापडले आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून गणेश नाईक गायब असून अटकपूर्व जामीनसाठी त्यांनी अर्ज केला होता. गुरुवारी (दि. 21) ठाणे सत्र न्यायालयाने ( Thane Session Court ) पुढील सुनावणी 27 एप्रिलला आहे. त्यामुळे गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

गणेश नाईक
गणेश नाईक
author img

By

Published : Apr 21, 2022, 10:41 PM IST

ठाणे - भाजपचे आमदार गणेश नाईक ( MLA Ganesh Naik ) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला असून नाईक अडचणी सापडले आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून गणेश नाईक गायब असून अटकपूर्व जामीनसाठी त्यांनी अर्ज केला होता. गुरुवारी (दि. 21) ठाणे सत्र न्यायालयाने ( Thane Session Court ) पुढील सुनावणी 27 एप्रिलला आहे. तोपर्यंत गणेश नाईक यांना दिलासा मिळालेला नाही त्यामुळे नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

बोलताना पीडितेचे वकील

ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने अत्याचार व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार बेलापूर व नेरुळ येथील पोलीस ठाण्यात गणेश नाईक यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून गणेश नाईक गायब असून नवी मुंबई पोलीस त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, गणेश नाईक यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर आज न्यायालयात सुनावणी झाली असून पुढील सुनावणी 27 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे नाईक यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

पीडितेने केली सुरक्षेची मागणी - पीडित महिलेने गणेश नाईक किंवा त्यांच्या कार्याकर्त्यांकडून आपल्या जीवास धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. सुरक्षेसाठी पोलीस व न्यायालयाकडे मागणी केल्याची माहिती पीडित महिलेच्या वकिलांनी दिली आहे.

गणेश नाईक यांना अटकेची शक्यता - गणेश नाईक यांना अटक करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत. कोपरखैरणे येथील घर आणि कार्यालय तसेच मुरबाडमधील फार्म हाऊसवर पोलिसांकडून नाईक यांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे लवकरच पोलिसांकडून त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - Maharashtra Minister Extramartial Affairs - विवाहबाह्य संबंधाच्या आरोपांमुळे महाराष्ट्रातील 'हे' नेते आले अडचणीत?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.